पाटनसावंगी टोल नाक्या लगत परीवारास लुटले : पोलिसांनी ५ तासात आरोपीस पकडले

पाटनसावंगी टोल नाक्या लगत परीवारास लुटले

पोलिसांनी ५ तासात आरोपीस पकडले

सावनेर : सावनेर पो.स्टे.हद्दीतील पाटनसावंगी टोल नाक्या नजीक दि.30 डीसेंबरच्या रात्री 12 च्या दरम्यान तीन अज्ञातांनी मुलाच्या गळ्यावर चाकु ठेवत 40 हजार रुपये नगद व 30 हजार रुपयांचे दागीने असा 70 हजार रुपयांचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले*

सविस्तर माहितीनुसार मोहम्मद रिजवान खान मु.नवी वस्ती मक्का मश्जिद टेका नाका नागपुर (वय 40 ) हे आपल्या परिवारासोबत लाल रंगाच्या मारोती स्विफ्ट क्र.MH 31 CK 2331ने रात्री बाराच्या दरम्यान आपल्या नातेवाईकाकडे छिंदवाडा येथे जात असताना पाटनसावंगी टोल जवळ मुलांना लघुशंका लागल्याने रस्त्याच्या कडेवर गाडी उभी करुण मुलांच्या लघुशंका आटोपताच वडिल मोहम्मद ही लघुशंका करत असतांना अचानक तीन अज्ञात आरोपींनी मोहम्मद रिजवान वर काठीने हल्ला चढवीला असता गाडीत बसलेले पत्नी साहिननाज खान 30 व मुलं मोहम्मद रियाज खान 9,मोहमंद जोहरान खान 7 हे वडिलांना कडे धावले असता आरोपी पैकी एकने त्याच्या जवळ असलेला चाकु एका मुलाच्या गळ्यावर ठेवत त्याच्या जवळ असलेली नगद 40 हजार रुपये व दागीने असा 70 हजार रुपयाचा ऐवज लुटन पसार झाले.या दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी पुढे येत असलेले वडील मोहम्मद रिजवान वर आरोपींने चाकुने हल्ला चढवला असता त्यांच्या चेहर्यावर व पोटावर वार करुण त्यांना जखमी करत असतांनाच छोटा मुलगा मोहम्मद जोहरान खान व त्याची आई यांनी जवळच असलेल्या टोल नाक्याकडे धाव घेतली व तेथील उपस्थितीत कर्मचाऱ्यांना मदत मागितली असता तेथील कर्मचारी घटनास्थळी धाव घेताच आरोपी सावनेरच्या दिशेने पसार झाले.

घटनेची सुचना पाटनसावंगी पोलीस चौकीचे एपीआय निशांत फुलेकर यांना देताच त्यांनी सदर सुचना ठाणेदार अशोक कोळी यांना कळविले. जखमीस मेओ हाँस्पिटल नागपुर येथे उपचारासाठी रवाना केले.

*पाच तासात लागला आरोपींचा छडा*

सावनेर ठाणेदार अशोक कोळी

*सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाटनसावंगी टोल नाक्यावर घडलेली घटना व आरोपी सावनेरच्या दिशेने पळाल्याच्या सुचनेवरुन ठाणेदारांनी सावनेर नागपूर व सावनेर छिंदवाडा जाणाऱ्या सर्व मार्गावर पाळत ठेवत पेट्रोलिंग करत असतांना पाहटेच्या दरम्यान सावनेर नजिकच्या रिलायंस पेट्रोल पंपाजवळ तीन संशयित संशयास्पद स्थीतीत असल्याची सुचना प्राप्त होताच सावनेर पोलीसांनी शिफातीने आरोपींना पकडन्याचा बेत आखला परंतू आंधाराचा फायदा घेत दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले तर मुख्य आरोपी भोला सुखदेव नागवंशी याला ताब्यात घेऊन माहिती मिळविली. टोल नाक्यावर घडलेल्या लुटपाटीची कबुली देत सह आरोपी दिलीप नत्थू उईके वय 31 रा.एकता नगर परतवाडा अमरावती तर घोडाडोंगरी जी.बैतुल मप्र येथील राजकुमार इमरुलाल पगारे वय 21 या तिघांनी मिळून सदर लुटपाटीची घटना केल्याची कबुली दिली.*
*पाटनसावंगी बिटचे एपीआय निशांत फुलेकर यांच्या सुचनेची वेळीच योग्य दखल घेत पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी योग्य नियोजनबद्ध पणे उपरोक्त घटनेतील एका आरोपींस पाच तासात अटक करुण घटनेचा छडा़ लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक अशोक कोळी व त्यांचे सहकारी एपीआय सतिश पाटिल, एपीआय निशांत फुलेकर, हेका.हेमराज कोल्हे,हेका.विजय पांडे,पो.का.प्रकाश ढोके,दिनेश गाडगे आदिंनी अथक प्रयत्न केले तर पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सरंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक कोळी व सहकारी पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सेवानिवृत्तांचा निधी अडकला ; अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिका-यांना निवेदन

Sat Jan 2 , 2021
*सेवानिवृत्तांचा निधी अडकला* *उपदान, अंशराशीकरण,गटविमा लाभापासून निवृत्त शिक्षक वंचित* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिका-यांना निवेदन* कन्हान : कोणत्याही शासकीय कर्मचा-याची वयाची 58 /60 वर्ष कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारी उपदान,अंशराशीकरन  निधी,गटविमा ही रक्कम ही त्याची उर्वरित आयुष्याची पूंजी असते व नियमानुसार हे सर्व लाभ वेळेत मिळणे अपेक्षित असते.परंतू ही […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta