कोविड सेंटर उघडण्यास विरोध ;  वार्डातील नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा : नगरसेविका सौ.स्वाती विलास कामडी

कोविड सेंटर उघडण्यास विरोध  वार्डातील नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना नगरसेविका सौ.स्वाती कामडी
सावनेर : स्थानिक शहरातील काही डॉक्टर वार्ड क्र .४ मधील गजबजलेल्या दाट वस्तीतील मेनरोड वरील कोल्हे बिल्डींग येथे कोव्हिड सेंटर उघडण्याच्या बेतात असल्याने येथील नगर सेविका स्वाती कामडी यांच्या नेतृतवात वार्डातील नागरीकांनी हे कोव्हिड सेंटर हेल्थ युनीट , गावाबाहेरील बंद मंगल कार्यालये येथे उघडण्यासंमंधी पर्याय सुचवून या कोव्हिड सेंटरला विरोध दर्शवित आंदोलनाचा ईशारा दिला आहे .
      सावनेर नागपूर रोड वरील वार्ड क्र .४ येथील कोल्हे बिल्डींग येथे शहरातील काही डॉक्टर कोव्हिड सेंटर उघडण्याच्या बेतात असल्याने या वार्डातील नागरीकांनी याचा विरोध दर्शवीत येथील नगर सेविका स्वाती कामडी यांच्या नेतृत्वात सावनेर उपविभागिय अधिकारी मा . अतुल मेहेत्रे यांना निवेदन देत हे ठिकाण गजबजलेल्या दाट वस्तीत असून या ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्याकरीता पालिकेच्या नाल्या व पार्किंगसाठी जागा नाही . संमंधीत कोल्हे बिल्डींग ही जिर्ण अवस्थेत आहे. तसेच या ठिकाणी अग्निशामकाची व्यवस्था नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे . कोव्हिड सेंटर साठी योग्य ठिकाण हे हेल्थ युनीटच्या खाली असलेल्या खोल्या , हॉल , सोबत मोकळे पटांगण असल्याने ही जागा तसेच गावाबाहेरील बंद असलेली मंगल कार्यालये या ठिकाणी सूरू करण्यास काहीच    
हरकत नसल्याचे या निवेदनातून सुचविण्यात आले असून या उपरांतही जर कोल्हे बिल्डींग येथे कोव्हिड सेंटर उघडल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला . यासाठी निर्माण होणाऱ्या परिस्थतीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असेही निवेदनातून म्हणण्यात आले आहे .
यावेळी नगरसेविका स्वाती विलास कामडी , शेषराव कडू , सुखदेव लांजेवार , निलकंठ खुबाळर , गुल्लू पत्रिकर , स्वप्नील चांदुरकर , धुरडे सर , काळमेघ , लालू कोल्हे , अहिल्या कडू , कविता सूर्यवंशी , तेलरान्धेताई , चेतना खुबाळकर , चांदुरकर बाई , कविता गमे , कविता भारती , पत्रिकर ताई , कौसल्या खुबाळकर , कविता गजभिये उज्वला मंडपे , प्रमिला खोडनकर , हेमलता खोडनकर , प्रेमलता घोरसे , विमल मोरे , दिशा भंडारी , सोनू ढंगले , योगिता ठाकरे , प्रमिला कोल्हे , सिमा लांजेवार , प्रेम गायकवाड , भूतेबाई , विलास कामडीसह वार्डातील अन्य महिला व पुरुष उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धनगर समाजाला घरकुल योजनेचा त्वरीत लाभ मिळावा

Thu Apr 1 , 2021
धनगर समाजाला घरकुल योजनेचा त्वरीत लाभ मिळावा* *उपविभागिय अधिकारी यांना निवेदन* सावनेरः  धनगर समाजाच्या ( एन.टी.सी ) घरकुल योजनेच्या 961 प्रस्तावाला 31 मार्च 2021 पूर्वी मजूर करुन या योजनेच्या अंमलबजावणीच्या विलंबास कारणीभूत अधिकान्यावर कारवाई करावी . अन्यथा टप्या टप्याने तिव्र आंदोलन करण्या बाबत माहितीस सादर महोदय महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेबर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta