धनगर समाजाला घरकुल योजनेचा त्वरीत लाभ मिळावा

धनगर समाजाला घरकुल योजनेचा त्वरीत लाभ मिळावा*
*उपविभागिय अधिकारी यांना निवेदन*
निवेदन देताना शिष्टमंडळ
सावनेरः  धनगर समाजाच्या ( एन.टी.सी ) घरकुल योजनेच्या 961 प्रस्तावाला 31 मार्च 2021 पूर्वी मजूर करुन या योजनेच्या अंमलबजावणीच्या विलंबास कारणीभूत अधिकान्यावर कारवाई करावी . अन्यथा टप्या टप्याने तिव्र आंदोलन करण्या बाबत माहितीस सादर महोदय महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेबर 2049 रोजी धनगर समाज बांधवांसाठी ( एन.टी.सी ) घरकुल योजनेचा अध्यादेश काढला गोर गरिब धनगर बांधवाना हक्काच चांगल घर मिळाव असा शासनाचा प्रामाणिक उद्देश होता . मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दिरंगाईने अद्यापही नागपूर जिल्हातील धनगर बांधवाना योजनेचा लाभ मिळाला नाही या बाबत अनेकदा निवेदन दिले. विविध वृत्तपत्रात बातम्या सुध्दा झळकल्या तरीही संबंधीत अधिकार्‍यांनी याकडे कमालीचे जानिवपुर्ण दुर्लक्ष केले परीणामी यावर्षीही धनगर बांधव घरकूल योजने पासून वंचित राहण्याची वेळ आली . उपरोक्त योजनेत शासनाने नागपूर जिल्हासाठी एक हजार घरकूलाचे तार्गेट दिले होते . जिल्हातील विविध तालुक्यातुन फक्त 961 प्रस्ताव ( अज ) सादर झाले संबधित विभागाने या योजनेचा योग्य रितीने प्रचार व प्रसार केला नाही यामुळे विविध गावातील अनेक धनगर बांधव घरकूल योजनेचा अर्ज सादर करु शकले नाही आता योजनेच्या यंदाच्या आर्थिक वर्षाच्या लाभाचा कालावधी संपत आला. यामुळे 31 मार्च 2021 पूर्वी नागपूर जिल्हातील विविध गावातून योजने अंतर्गत सादर झालेले 961 अर्ज सरसकट मंजूर करावे क्षुल्लक पट्याची पुर्ती नंतर करण्यात यावी . तदवत धनगर बांधवांना त्वरीत योजनेचा लाभ दयावा . या योजनेचें नामंजूर करण्यात आलेले अर्ज संबंधीत कर्मचाऱ्यानी स्वीकारले कसे त्याचवेळी पट्टयांचे पुर्तता का करण्यात आली नाही , धनगर बांधवाना स्पष्ट सुचना का दिल्या नाही, पंचायत समिती स्तरावरच अर्जाची छानणी का केली नाही , हे अर्ज समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास कार्यालय नागपूर येथे ऐवढे दिवस धुळखात का पडले राहले असे नानाविध प्रश्न उदभवते या बाबत सखोल चैकशी करुन धनगर बांधवाना घरकूल योजने पासून वंचित ठेवणऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे 31 मार्च 2021 पूर्वी धनगर समाज बांधवाना घरकूल योजनेचा लाभ न मिळाल्यास या योजनेच्या अंमलबजावनीच्या विलंबास कारणीभूत अधिकार्‍यांवर कारवाई न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल याला संबंधीत विभागाचे वरीष्ठ अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील धनगर समाजाचे आंदोलन कोविड 19 च्या नियमांच्या अटि शर्तीचे पालन करुन करण्यात येईल असे निवेदनातून स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात ५५ कोरोना रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

Thu Apr 1 , 2021
कन्हान परिसरात ५५ कोरोना रूग्णाची भर   #) गहुहिवरात एका रूग्णाचा मुत्यु.  #) कन्हान चाचणीत ४८ व साटक ७ असे एकुण ५५ रूग्ण आढळुन एकुण १९३८ रूग्ण.       कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे गुरूवार (दि.१) एप्रिल१५१ ला रॅपेट १५१ चाचणीत ४८ व प्राथमिक आरोग्य […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta