दुचाकीची आपसात धडक 1 मृत : खुरजगाव फाटयाजवळील घटना

सावनेर : दुचाकीने कंपनीत कामावर जात असतांना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अँक्टीव्हा गाडीने निष्काळजीपणाने धडक दिल्याने होंडा स्प्लेंडर चालकाचा जागीच मृत्यू झाला . ही घटना आज सकाळी ६:५० च्या सुमारास खुरगांव फाटयावर घडली . मनोहर महादेव ढोके ( ५० ) रा . ढालगांव खैरी असे मृतकाचे नांव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सातच्या सुमारास मृतक हा मंगसा येथिल जिटिएन कंपनीत कर्त्यव्यावर जात असतांना खुजगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकी अॅक्टिव्हा क्र.एम.एच.४०- ए.एच-८९९४ धडक झाल्याने मनोहर ढोके याला डोक्याला जबर मार लागुन जागीच मृत्यु झाला तर समोरिल दुचाकी धारक दोघे किरकोळ जखमी झाले. केळवद पोलिसांनी अपराध क्र. २७९,३३७,३३८,३०४(अ) नुसार गुन्हा नोंदवित पुढिल तपास करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मा.कै.वसंतरावजी नाईक साहेब यांची १०७ व्या जयंती साजरी

Thu Jul 2 , 2020
घाटंजी : दिनांक १/७/२०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,हरित क्रांतीचे प्रणेते मा.कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांची १०७ व्या जयंती निमित्य घाटंजी येथे बंजारा समाज बांधव व राष्ट्रीय बंजारा टायगर्स तर्फे नाईक साहेबांची जयंती व वृक्षरोपनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी तांड्याचे नायक नामदेवरावजी आडे व कारभारी अरविंदभाऊ जाधव यांच्या हस्ते […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta