*जिल्हा परिषद यवतमाळ येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जी.चव्हाण सर यांचा निरोप समारंभ*
यवतमाळ :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी तर्फे सी.जी.चव्हाण सर यांना सेवानिवृत्त दिवशी भेट देण्यात आली. पांढरकवडा तालुक्यातील साखरा या ऐका छोट्याश्या खेडेगावातून आपल्या प्रवासाची सुरवात करत काल दिनांक ३१/८/२०२० रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जि. चव्हाण साहेब हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या ३१ वर्षांचा कार्यकाळा दरम्यान त्यांनी विस्तार अधिकारी ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद कोणतेही गालबोट न लागता केलेला प्रवास म्हणावं तितका सोपा नव्हता. दर्यापूर येथे गटविकास अधिकारी म्हणून रुझु असतांना निवडणुकी दरम्यान सलाईन लागली असतांना त्या दिवशी देखील ड्युटी केली अशा कर्तव्य कठोर स्वभाव पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी यांनी अनुभवला.वेळे प्रति कटीबद्द असलेले असे अधिकारी
त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी त्यांच वाक्य सगळ्यांना प्रेरणा देणारं होत.
“मनुष्य कधीच सेवानिवृत्त होत नसतो.”
काल दि.३१.८.२० रोजी या निरोप समारंभा प्रसंगी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हा अध्यक्ष अरविंदभाऊ जाधव, बंडूभाऊ जाधव,संजय आडे,कैलासभाऊ राठोड, आकाशभाऊ जाधव आदी मान्यवर मंडळींतर्फे पुष्पगुच्छ देऊन चव्हाण साहेब यांना निरोप देण्यात आला.