पिपरी- कन्हान येथे जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत

पिपरी- कन्हान येथे जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत

#) अध्यक्ष विजय केवट तर सचिवपदी महादेव केवट यांची निवड. 


कन्हान : – लगतच असलेल्या पिपरी येथे भारतीय भोई विकास मंडळाचे राष्ट्रीय महासचिव दिलीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.२५) सप्टेंबर ला पावन हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सभागृहात जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत करण्यात आली.

       या कार्यकारणीत अध्यक्ष विजय केवट, उपाध्यक्ष विनोद गोंडाने, सचिव महादेव केवट, कार्याध्यक्ष नितेश केवट, मार्गदर्शक रामचंद्र भोयर तर सदस्य प्रकाश मेश्राम, आकाश केवट, कमलेश दुधबावणे, प्रविण केवट, रवी मोहनकर, प्रमोद ठाकरे, रोशन उके, रुपचंद ठाकरे, आनंद मेश्राम, उपासराव बावणे, रोशन मेश्राम, निलेश बावणे, गंगाधर पट्टेबावणे आदींचा समा वेश करण्यात आला. उल्लेखनीय आहे की, जीवन रक्षक दल, ढिवर समाज संघटना मागील अनेक वर्षां पासून जिल्ह्यातील नदी पात्रात व तलावात डुबलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी व मृतदेह बाहेर काढण्या साठी सातत्याने कार्य करीत असून त्याचे सहकार्य पोलीस विभागाला नेहमीच मिळत असते. शासनाने अशा पोहणाऱ्या तरुण युवकांना महाराष्ट्रातील प्रत्येक ठाण्यात शासकीय सेवेत व आर्थिक मदत करण्याची मागणी यावेळी आपल्या भाषणात भारतीय भोई विकास मंडळाचे राष्ट्रीय महासचिव दिलीप मेश्राम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कोळसा खदन येथे पकडला १२ - १३ फुटाचा अजगर

Sat Oct 2 , 2021
कोळसा खदन येथे पकडला १२ – १३ फुटाचा अजगर #) सर्प मित्रांनी जंगलात सोडुन दिले जिवदान. कन्हान : – शहरा पासुन ३ किमी अंतरावर असलेल्या कोळसा खदान नंबर ६ टेकाडी येथे श्रीराम खरवाल यांच्या शेतात अजगर प्रजातीचा साप दिसल्याने परि सरात चांगलीच खळबळ उडाल्याने खदान नंबर ६ चे ग्रा पं सदस्य […]

Archives

Categories

Meta