माहेर महिला मंच द्वारे हळदी कुंकु कार्यक्रम थाटात

कन्हान,ता.०२ फेब्रुवारी
माहेर महिला मंच कन्हान द्वारे हळदी-कुंकू कार्यक्रम शनिवार (दि.२८) जानेवारी ला माहेर महिला मंच कन्हान द्वारे हळदी-कुंकू व विविध कार्यक्रमाचे आयोजन कुलदीप मंगल कार्यालय कन्हान येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व माहेर महिला मंच अध्यक्ष सौ.रिताताई नरेश बर्वे, प्रमुख अतिथि माहेर महिला मंच उपाध्यक्षा सौ.प्रतिमा घारपिंडे, सचिव सौ.सुनीताताई मानकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, अंताक्षरी, रोल प्ले, फॅशन शो, उखाणे, डान्स कॉम्पिटिशन सह आदि विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर माहेर महिला मंचच्या सचिव सौ.सुनीता मानकर यांनी स्वतःआत्मबल वाढवून स्वयंरोजगार तयार कसा करता येईल यावर महिलांना मार्गदर्शन केले. माहेर महिला मंच अध्यक्ष सौ.रिताताई बर्वे यांनी आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनातुन महिलांना त्यांचे सुप्त गुणांना वाव मिळावे, त्यांना त्यांचे स्वतःचे स्टेज मिळवून देणे, त्यांचे आत्मबल वाढवणे, स्वावलंबी बनवणे आणि स्वतःचे संरक्षण करणे इत्यादी विषयांवर उपस्थित महिलांना संबोधित केले.

कार्यक्रमात मान्यवरांचा हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त झालेल्या विद्यार्थांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले. तसेच राशन दुकानदार संघटना नागपूर ग्रामीण अध्यक्ष पदी सौ.सुनीता मानकर यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे शाॅल, श्रीफल आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांना हळदी कुंकु लावुन वान वाटप करुन आणि अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेविका सौ.गुंफा तिडके , कु.रेखा टोहने, पुष्पा कावडकर, मीना वाटकर, सविता बावणे, वनिता मसार, छाया रंग, मीना ठाकूर, सरोज राऊत, प्रगती बावनकुळे, सोनिका शर्मा, सुनिता भगवे, रंजीता सूर्यवंशी, कल्पना बागडे, सुमन भिवगडे, वंदना बागडे, प्रतिभा घारपिंडे, विशाखा ठमके, कुसुम बडे, सुनंदा कठाणे, राजकन्या यादव, मेघा उके, मंदा बागडे, सह आदि महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .कार्यक्रमाची प्रास्तावना सौ.सुनंदा कटाने यांनी तर सूत्रसंचालन सौ.प्रतिभा बावनकुळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन कु.अर्पिता डे यांनी केले .
Post Views:
152
Sat Feb 4 , 2023
लाचखोर पीएसआय , शिपाई जाळ्यात अटक टाळण्यासाठी 40 हजारांची मागणी सावनेर : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी खापा पोलीस ठाणे परिसरात सापळा रचुन लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायाला अटक केली . चोरी प्रकरणात अटक टाळण्यासाठी 40 हजाराची मागणी केली होती लाचची रक्कम स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले […]