वाचनालय कामठी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

वाचनालय कामठी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

कामठी,ता.०२ ऑगस्ट

    साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त शाहिर राजेंद्र भिमराव बावनकुळे यांनी साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या छायाचित्रा ला माल्यार्पण करून अभिवादन केले.

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर उज्वल रायबोले यांनी मार्गदर्शन केले. कुंदन सार्वजनिक वाचनालय रामगड कामठी येथे आयोजित कार्यक्रमात शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचा वाचनालयाचे संचालक नरेश बर्वे यांच्या हस्ते शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे मानधन समिती सदस्य यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

   प्रास्तविक शंकर चवरे यांनी तर संचालन मनोज तेलंग यांनी केले आभार दिनेश खेडकर यांनी मानले. प्रसंगी भाजप अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले, इंदोरा ग्राम पंचायत उपसरपंच वीरेंद्र सेंगर तसेच प्रज्वल सौलंकी, अभिषेक कनोजे, मिलिंद बागड़े, संतोष धुरिया, अंकित बंसोड, रोहित मेश्राम, निमिष सांगोड़े, आकाश बोंबले, महेश बावने प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महामार्ग पोलिसांनी वाचविले चिमुकल्यासह चौघांचे प्राण

Fri Aug 4 , 2023
महामार्ग पोलिसांनी वाचविले चिमुकल्यासह चौघांचे प्राण कन्हान,ता.०३ ऑगस्ट नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरिल अण्णा मोड डुमरी जवळ ट्रक चालकाने आपले वाहन विरूध्द दिशेने व निष्काळजीपणे चालवुन रूग्णवाहिकेला सामोरासामोर धडक दिल्याने भर पावसात झालेल्या अपघातात रूग्णवाहिका चालक, नर्स, प्रसुत महिला व तिचे दहा दिवसांचे बाळ जख्मी अवस्थेत रूग्णवाहिकेत अडकलेल्यांने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव […]

You May Like

Archives

Categories

Meta