ऑनलाईन साप्ताहिक अहवालास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध

*ऑनलाईन साप्ताहिक अहवालास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध..

कन्हान ता.1 ऑक्टोबर 

        महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने एका पत्राद्वारे राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांचा शिक्षणाबाबत आँफलाईन-आँनलाईन साप्ताहिक अहवाल मागवला आहे.वेळोवेळी पर्यवेक्षीय यंत्रणेकडून याबाबत माहिती घेत असतांना हा सप्ताहिक अहवाल भरून घेणे म्हणजे शिक्षकावर अविश्वास दाखवणे आहे त्यामुळेच या साप्ताहिक अहवालास संघटनेचा विरोध असल्याचे निवेदनअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बस्वदे व सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी शिक्षणमंत्री,शिक्षण सचिव  व शिक्षण संचालक यांना दिले आहे.

   शिक्षक सद्या आँनलाईन -आँफलाईन अध्यापना बरोबरच आपत्कालीन व्यवस्थेत आपली सेवा देत आहेत या दुहेरी कामाचा बोजा पडत असतांना सुद्धा शिक्षक प्रामाणिक पणे वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून आपले अध्यापनाचे काम नियमितपणे करत आहेत. कोवीड ड्युटीमुळे अनेक शिक्षक व त्यांचे परीवारास कोरोनाने ग्रासले आहे. 

     ग्रामीण व दुर्गम भागातील स्थिती पाहाता हा  अहवाल भरण्यासाठी पुन्हा शिक्षकांना मोठ्या गावात,शहरात नेट कँफेवर जावून अहवाल भरण्याचे काम करावे लागेल.

त्यामुळे अहवाल घेण्याचे पत्र तात्काळ रद्द करावे अन्यथा संघटना अहवाल लिंक भरण्यावर बहीष्कार टाकणार 

असल्याचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा मिडीया प्रमुख प्रेमचंद राठोड

 यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

बहाद्दुर शास्री आणि महात्मा गांधी जयंती साजरी : खापा

Fri Oct 2 , 2020
खापा : आज दि. २आँक्टोंबर लाल बहाद्दुर शास्री आणि महात्मा गांधी जयंती या निमीत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश बावने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मकसुद शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कपिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. विद्याताई लक्ष्मनजी तुमाने, राष्ट्रवादी मीडिया सेल अध्यक्ष आकाश बारापात्रे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष फिरोज […]

You May Like

Archives

Categories

Meta