किरंगी सर्रा गावी कॅरोसिन चे वाटप जि प अध्यक्ष रश्मि बर्वे चे हस्ते ; विज पुरवठा सुरळीत होणार महावितरण चे प्रादेशीक् संचालक सुहास रंगारी

किरंगी सर्रा गावी कॅरोसिन चे वाटप जि प अध्यक्ष रश्मि बर्वे चे हस्ते,विज पुरवठा सुरळीत होणार महावितरण चे प्रादेशीक् संचालक
सुहास रंगारी

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी (ता प्र):–पारशिवनी तालुकयातिल किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून महापुर पासुन बंद असलेला विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण पारशिवनी ,उपविभागिय अधिकारी,रामटेका ,व तहसिलदार यांना गट ग्राम पंचायत कोलितमारा चे सरपंच , कालिराम उके,उपसरपंच,.मिरा इरपाची व किरंगीसर्रा गाव चे राजु धुर्वे , रेखा अनिल कोडवते ग्रा पं सदस्य यांचे कडुन निवेदन देण्यात आले व गावाना कॉरोसिन चा पुरवठा करण्याची मागणी केली असतानी त्या निवेदन वर दखल देत तहसिलदार वरूण कुमार सहारे ह्यानी किरंगी स र्श गावातील ५६ कुटुबांना प्रत्येकी कुटुबं चार लिटर कॅरोसिन चा वाटप नागपुर जिल्हा परिषद अध्यक्ष राश्मि बर्वे व जि प सदस्या शांता कुमरे ,कोलितमारा चे सरपंच कालीराम उके ,कारंगीसर्रा चे ग्राम पंचायत सदस्य राजु धुर्वे,रेखा कोडवते यांचे उपस्थितीत ५६ कुटुवांना प्रत्येकी ४लिटर कॅरोसिन चा वाटप कर०यात राशन दुकानदार सुषमा सोमकुवर यांचे कंट्रोल दुकान या माहिना पासुन प्रत्येक माहे धान्य चा ही वाटप आता करंगीसर्रा गावात वाटप कर०याचे आदेश तहासेलदार वरुण कुमार सहारे ने दिले यात करंगीसर्रा,मैकेपार, सुरेरा,व कोलीतमारा गावातील लोकाचे धान्य करंगी सर्रा गावातुन वाटण्यात येणार आहे.

भाजपा युवा मोर्चा र्तर्फ विद्युत अभियंता यांना निवेदन वरून त्वरित दखल घेतली महावित२ण विभागाचे वशिष्ठ अधिकरी सोमवार ला भेट दिली
पेंच नदीच्या काठावरी आणि पुरामुळे चहुबाजूने वाढलेल्या किरगीशरा गावातील वीज यंत्रणेची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली त्यासाठी या अधिकाऱ्यांना नावेतून गाव गाठावे लागले ,पुराचे पाणी ओंसरताच तात्काळ वीज यंत्रणा उभारावी असे निर्देश यावेळी प्रभारी प्रात्यक्षिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले, ऑगस्ट महिन्यात झालेले जोरदार अतिवृष्टीमुळे मध्यप्रदेशातील चौराई धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले, याशिवाय महाराष्ट्रातील तोतलाडोह धरण आणि नवेगाव खैरी धरण यातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने याही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे या दोन्ही धरणाचे मध्यभागी असलेले किरगीसर्रा गाव पूर्णपणे पाण्याने वेढले गेले या गावात नदीच्या दुसऱ्या काठावर असलेल्या कोलितमारा गावातील नवेगाव खैरी चारगाव फिटर वरून वीज पुरवठा करण्यात येतो परंतु अतिवृष्टीमुळे ते नदीच्या पात्रातील खांब कोसळले असून सुमारे ९५० मीटरची वीज वाहीका पाण्यात पूर्णपणे बुडालीआहे या गावाच्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी गावाला अनेकदा भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली ,परंतु जोपर्यंत पाण्याची पातळी कमी होत नाही तोपर्यंत येथील वीज यंत्रणेचे काम करणे अत्यंत अवघड आहे
महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके ,नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता नारायणा आमझरे ,सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे यांनी 26 सप्टेंबरला करंगी सर्रा येथे भेट देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत च्या परिस्थितीचा आढावा घेतला गावात सुमारे मी जोडण्यात असून येथील गाव कर यांची या अधिकाऱ्यांनी संवाद साधला तसेच पाणी ओसरताच वीज पुरवठा पूर्ववत करण्याबाबत आश्वासित केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

माहुली"तू माझी रेती चोरीबाबत मुखबरी कश्या करीता करतो"म्हणुन मारहाण  : आरोपी अटकेत

Mon Nov 2 , 2020
माहुली”तू माझी रेती चोरीबाबत मुखबरी कश्या करीता करतो”म्हणुन मारहाण  : आरोपी अटकेत ,पारशिवनी पोलिसाची कार्यवाही कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी   पाराशिवनी (ता प्र):-पोलीस स्टेशन पारर्शिवनी हदीतील माहुली येथे फिर्यादी रोशन निरंजन पहाडे वय 21 बर्ष ,राहणार माहुली ‘ तू माझी रेती चोरीबाबत मुखबरी कश्या  करीता करतो ‘ यांनी लेखी […]

You May Like

Archives

Categories

Meta