गोंडेगाव कॉलोनीत साठ हजाराची घरफोडी
कन्हान : – वेकोलि वेकेलि गोंडेगाव कॉलोनी येथील रहिवासी प्रदीप प्रफुल बारई हे आपल्या परिवारासह पश्चिम बंगाल येथे गेले होते. परत आल्यावर त्याच्या घराचे कुलुप तोडुन अज्ञात आरोपीने घरफोडी करून चार तोळे सोने, टि व्ही, घडयाळ, शेगडी व नगदी अशा एकुण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करून तपास सुरू आहे.
वेकोलि वेकेलि गोंडेगाव कॉलोनी येथील रहिवासी प्रदीप प्रफुल बारई हे (दि.१०) ऑक्टोंबर २०२१ ला आपले गावी पश्चिम बंगाल येथे कार्यक्रमासाठी परीवारासह गेले होते. मंगळवार (दि.१) फेब्रुवारी २०२२ ला रात्री ९.३० वाजता आपले घरी परत आले असता त्याचे घराचे कुलुप तुटून होते. आत पाहिले असता आलमारीत ठेवलेले सोन्याचे जुने वापरलेले दागिने ४ तोळे किमत ४८००० रू व घरातील टी. व्ही, घडयाळ, शेगळी अंदाजे किंमत ७००० रू व नगदी १५००० रू असा एकुण ६०००० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला असावा अश्या फिर्यादी प्रदीप बारई यांचे तोंडी तक्रारी वरून व मा पोनि विलास काळे यांचे आदेशाने अप.क्रं ४३/२०२२ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सफो गणेश पाल हे करित आहे.