सायबर गुन्हयाविषयी जनजागृती मोहिम

नागपुर : सायबर पोलीस स्टेशन , नागपूर शहर येथे सिताराम चर्तुवेदी , वय ५६ वर्ष , रा . गोरेवाडा नागपूर यांनी दिनांक ३१/०३/२०२१ रोजी तक्रार दिली की , अर्जदार यांना एका अज्ञात इसमाने मोबाईल ने संपर्क केले व त्यांना सांगितले कि आपल्या बँक खात्यातुन एकुण २,१०,००० / – रू निघुन गेले आहे . अर्जदार यांनी आपल्या बँक खात्याची माहीती कोणालाही दिली नसल्याने अर्जदार हे लगेच आपल्या खाते असलेले स्टेट बँक ऑफ इंडिया , शाखा रामदासपेठ नागपूर येथे गेले असुन अर्जदार यांना माहीत झाले कि , त्यांच्या २,१०,००० / -रू , कोणीतरी सायबर आरोपीने ऑनलाईन एफ.डी केली आहे , अशी माहीती बॅकने दिली . अर्जदार हे सायबर पोलीस स्टेशन ला तकार देण्याकरिता आले . अर्जदार यांचे त तक्रारीच्या अनुषंगाने स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा रामदासपेठ नागपूर यांना फोनद्वारे व ईमेल द्वारे वारंवार पत्रव्यवहार केले व तक्रारीचा सतत पाठपुरावा करून फसवणुक झालेली संपुर्ण रक्कम २,१०,००० / -रू . त तक्रारदार यांच्या बँक खात्यात परत मिळवुन देण्यास सायबर पोलीस स्टेशनला यश प्राप्त झाले आहे . सदरची कारवाई मा . श्री अमितेशकुमार , पोलीस आयुक्त , नागपूर शहर , श्री सुनिल फुलारी , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , नागपूर शहर यांचे आदेशान्वये श्री विवेक मासाळ , पोलीस उप आयुक्त , आर्थिक / सायबर गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . अशोक बागुल , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सायबर पोलीस स्टेशन , नागपूर शहर सहा.पोलीस निरीक्षक श्री केशव वाघ व नायक पोलीस शिपाई ब.नं. ४२०२ श्रीकृष्णा इवनाते यांनी तकारदार यांची ऑनलाईन गेलेली रक्कम परत मिळवुन देण्यास उत्कृष्ठ कामगिरी केली .

यापूर्वी सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर तर्फे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . अशोक पोलीस स्टेशन नागपूर शहर यांनी आता पर्यंत ६३ वेबिनार तसेच प्रत्यक्ष जाऊन सेमिनार घेऊन नागरीकांमध्ये सायबर गुन्हयाविषयी जनजागृती केली आहे व नागरीकांना या सायबर गुन्हयापासून कशा प्रकारे सुरक्षित राहता येईल याची सुध्दा माहिती दिली आहे . सदरचे वेबिनार हे मा . श्री अमितेशकुमार , पोलीस आयुक्त , नागपूर शहर , श्री सुनिल फुलारी , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , नागपूर शहर यांचे आदेशान्वये श्री विवेक मासाळ , पोलीस उप आयुक्त , आर्थिक / सायबर गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . अशोक बागुल , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सायबर पोलीस स्टेशन , नागपूर शहर यांनी घेतले असून याकामी श्रीमती . रिता ठाकुर , नापोशि / १८५ ९ यांनी या कामात मदत केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मी घेतलेला कोरोना योध्दाचा अनुभव : संजय आडे

Tue May 4 , 2021
💉 *मी घेतलेला कोरोना योध्दाचा अनुभव*💉 काल दिनांक 3/5/2021 रोजी पांढरकवडा येथे Covishield लस घेण्याकरिता गेलो असता खऱ्या कोरोना योद्धा ची भेट झाली त्यांच नाव खरच आदराने घ्यावं अस वाटते *स्वाती कुमरे* पांढरकवडा सेंटर (उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा) आपण लसीकरण घेण्याकरिता गेलो असता काही लोकांना 1 तास अर्धा तास जरी उशीर […]

You May Like

Archives

Categories

Meta