श्री संत सेवालाल महाराज तांडा घाटंजी तिज विसर्जन सोहळा दिनांक 31/08/2021

*श्री संत सेवालाल महाराज तांडा घाटंजी तिज विसर्जन सोहळा दिनांक 31/08/2021*

घाटंजी  :  येथे बंजारा समाजाच्या रीतीरिवाज आणि परंपरे नुसार तिज विसर्जन करण्यात आले. घाटंजी तांड्याचे नायक श्री नामदेवराव आडे यांच्या निवासस्थानी दि.22/8/21 रोजी तिज पेरण्यात आली त्यानंतर 9 दिवस मुलींनी नाचत गात त्या तिजवर पाणी टाकून त्याचे पूजन केले,सोमवारी सायंकाळी 7.00 वासता संत सेवालाल मंदिर येथे श्रीकृष्ण मूर्तीची स्थापणा करण्यात आली.श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजन केल्यानंतर मंगळवार रोजी दुपारी 1.00 वासता तिज तोडण्याकरिता समस्त समाज बंधू भगिनी मंदिरावर जमल्या.

दरवर्षीप्रमाणे घाटंजी तांड्यातील निवृत्त जेस्ट नागरिकांचे यावेळी शाल श्रीफळ देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आले या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून जेबसिंगजी राठोड, सौ.मीनाक्षी ब्रम्हानंद चव्हाण,शामभाऊ राठोड, गोवर्धनजी आडे होते. सोबतच तांड्याचे नायक नामदेवराव आडे, कारभारी अरविंदभाऊ जाधव, डाव बंडूभाऊ जाधव, मंदिर निर्मान समितीचे अध्यक्ष कैलाशभाऊ राठोड तसेच जेस्ट नागरिक नेहरू महाराज
सीताराम राठोड,मोहन राठोड,केवलसिंग जाधव,रामधन राठोड,डॉ देविदास राठोड,ऍड मनोज राठोड,अनिल जाधव यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
नंतर मूर्तीचे पूजन तिज पूजन व आरती करून वाघाडी नदीच्या पवित्र पात्रात विसर्जन करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन पी.एस. राठोड सर यांनी, प्रास्ताविक संजय आडे यांनी तर आभार बाबूसिंग राठोड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी व्हावे करिता प्रा.रवी आडे सर,संदीप जाधव सर,बाळकृष्ण आडे, निखिल जाधव,रोशन जाधव,विजय चव्हाण,संदीप चव्हाण,रमेश जाधव आदींनी परिश्रम घेतले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र संघास रौप्य पदक

Sun Sep 5 , 2021
राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र संघास रौप्य पदक # ) नागपुर जिल्ह्याचे अमित राजेन्द्र ठाकुर, चिन्मय भगत व हर्षल बढेल यांचा समावेश.  कन्हान : –   टग ऑफ वाॅर फेडरेशन ऑफ इंडिया व टग ऑफ वाॅर असोसिएशन राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या ३४ व्या राष्ट्रीय रस्सीखेच  स्पर्धेत महाराष्ट्र संघाने खुल्या वजन गटात […]

You May Like

Archives

Categories

Meta