सिगोरी माईन्सवर धडकले स्थानिक प्रकल्पग्रस्त : पारशिवनी

*सिगोरी माईन्सवर धडकले स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याची मागणीसाठी धरणा, आज,तिसरा दिवस खदानीच्या वाहनांची चाके थांबली*
कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पारसिवनी:(ता प्र) – पाराशिवनीत सिगोरी ला वेकोली ची कोळसा खदान गेल्या तीन वर्षांपूर्वी पारशिवनी तालुक्यातील सिगोरी, साहोली, डोरली, हिगणा येथील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी डब्ल्यू. सी. एल. ( कोलमाईन्स) कंपनीने खरेदी करून येथे कोळसा काढण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने रोजगार देण्यात येईल, असे आश्‍वासन कंपनी प्रशासकांनी दिले होते. मात्र, तीन वर्ष होऊनसुद्धा अजूनही रोजगार दिला नसल्याने स्थानिक युवकांनी कंपनीविरोधात आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, डब्ल्यूसीएलच्या सिगोरी कोळसा खदानमधून मोठय़ाप्रमाणात ट्रकमधून कोळश्याची होणारी वाहतूक थांबली आहे.
आंदोलकांच्या मते, सिगोरी कोळसा खदान भागातील प्रकल्पग्रस्त स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, यासाठी गुरुवारी (१ ऑक्टोबर) सकाळी पारशिवनी-नागपूर मार्गावरील सिगोरी गावाजवळ स्थानिकांनी आदोलन केले. तसेच या कोळसा खदानीत नेहमीच ब्लास्टींग केली जात असल्याने या भागातील गावातील घरे हादरत असून, घरांना भेगा पडत असल्याने मोठे नुकसान होत आहे.
नुकसान झालेल्या घरमालकांना नुकसानभरपाई द्यावी तसेच कंपनी व प्रकल्पग्रस्त संघर्षात निरपराध युवकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, कोळश्यासोबत जास्त पाण्याचा उपसा केला जात असल्याने या चारही गावातील विहीरी आटल्या जात आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी नसल्याने कंपनी प्रशासनाने शेतकार्‍यांसाठी सिंचनाची व्यवस्था करून द्यावी, जड वाहतुकीमुळे परिसरातील गावात असलेले रस्ते पुर्णपणे उखडले असल्याने नागरिकांना जाण्यायेण्यास योग्य रस्ता निर्माण करण्यात यावा, पाण्याची पातळी खोल गेली असल्याने विहीरी आटल्या जात असल्याने चारही गावात जल शुद्धीकरण यंत्र सि एस आर फंडातुन लावण्यात यावे, आदी मागण्या आंदोलकांच्या आहे.
आंदोलक व कंपनी प्रशासनात आंदोलनस्थळी दोन बैठका१)तहासेल कार्यालय ,व २)पोलिस स्टशशन ,पारशिवनी येथे झाल्या. पण, तोडगा निधत नसल्याने आंदोलकानी आंदोलन सायंकाळपर्यंत सुरूच ठेवले.तर अधिकारी ही मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याने आंदोलक अधिकच चिडले. वृत्त लिहेस्तोवर आज तिसरे दिवस ही आंदोलन सुरूच होते. आंदोलनात म. प्र काँग्रेस कमेटी अनु.जाती विभागाचे अध्यक्ष हर्षवर्धन निकोसे, माजी सरपंच विजय निकोसे, प्रमोद काकडे, अमजद पठाण, सुरेश बागडे व शेकडो ग्रामस्थांसह महिलाही शेकडोंच्या संख्येत सहभागी झाल्या होत्या. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त माल्यार्पन : कामठी  

Sat Oct 3 , 2020
  भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त माल्यार्पन* कामठी : आज दिनांक 2-10-2020 को महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त नगर परिषद कार्यालय कामठी येथे माल्यार्पन करण्यात आले यावेळी संजय कनोजिया (अध्यक्ष भाजपा कामठी शहर), लाला खंडेलवाल (कार्याध्यक्ष, भाजपा कामठी शहर), […]

You May Like

Archives

Categories

Meta