कन्हान कॉग्रेस व्दारे हाथरस घटनेचा निषेद

कन्हान कॉग्रेस व्दारे हाथरस घटनेचा निषेद 


कन्हान : – कांग्रेसचे नेते राहुलजी गांधी, उत्तरप्रदेश प्रभारी महासचिव श्रीमती प्रियंकाजी गांधी हे हाथरस पिड़िता च्या परिवारास भेट देण्यास जात असताना थांबवुन ग्रेटर नोएडा एक्सप्रेस हायवे वर उत्तरप्रदेश सरकार तथा उत्तरप्रदेश पोलीसांनी अमानवीय व्यवहार करून धक्का भुक्की करित खाली पाडले.लाठी चार्ज करित अटक करून परत नेल्याच्या निषेधार्थ स्थानीय तारसा चौक कन्हान येथे गुरूवार (दि.१) ला रात्री ८. ३० वाजता नागपुर जिला (ग्रामीण) कांग्रेस कमेटी महासचिव मा. उदयसिंह (गज्जू) यादव, उपाध्यक्ष व नगरसेवक कन्हान नरेश बर्वे आणि रामटेक विधानसभा युवक काँग्रेस , कन्हान शहर युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वात टायर जाळुन, उत्तर प्रदेश भाजपा सरकार चा निषेध करून घोषणा देत जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कॉग्रेस कॅमेटी कन्हान अध्यक्ष राजेश यादव, यु कॉ रामटेक विधानसभा अध्यक्ष निखिल दा.पाटील, महासचिव आकिब सिद्दीकी यु कॉ कन्हान अध्यक्ष राजा यादव,अजय कपसीकर, नगरसेविका रेखा टोहणे, प्रमोद बांते, गणेश माहुरे , प्रशांत वाघमारे, सतीश भसारकर, अमोल प्रसाद, सिधु ढोके, शक्ती पात्रे, शरद वाटकर, अविनाश रायपुरकर, पंकज गजभिये, इमरान शेख, प्रदीप बावणे, अक्षय यादव, निखिल बागळे, राहुल बावणे, सहील गजभिये, सारंग काळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

Sat Oct 3 , 2020
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी कन्हान ता.2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शिवशक्ती आखाडा येथे दि.2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. यावेळी लहान चिमुकल्यानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त वेशभूषा साकारून अल्पसा परीचय करून दिला. या कार्यक्रमाचा निमित्ताने शिवशक्ती आखाडाचा वतीने विद्यार्थी […]

You May Like

Archives

Categories

Meta