*महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री की जयंती केली साजरी
* कन्हान शहर विकास मंच ने केले आयोजन
कन्हान – कन्हान शहर विकास मंच च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे प्रंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा जयंती निमित्य गांधी चौक येथे थटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात कन्हान पोलीस स्टेशन चे प्रभारी थानेदार चंन्द्रकांत मदने यांनी देशाचे दुसरे प्रंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण केले तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण सखी मंच अध्यक्ष पौर्णिमा दुबे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमात कन्हान पोलीस स्टेशन चे प्रभारी थानेदार चंन्द्रकांत मदने , सखी मंच अध्यक्ष पौर्णिमा दुबे , नगरसेविका रेखा टोहणे , सुप्रित बावने , यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संचालन मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांनी केले तर आभार मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी मानले.
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच चे सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , प्रवीण माने , कामेश्वर शर्मा , अदरीराम कनोजिया , सतिश ऊके , जाॅकी मानकर , प्रकाश कुर्वे , सुषमा मस्के , वैशाली खंडार , श्वेता गुप्ता , आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.