लाचखोर पीएसआय , शिपाई जाळ्यात ; अटक टाळण्यासाठी 40 हजारांची मागणी

लाचखोर पीएसआय , शिपाई जाळ्यात

अटक टाळण्यासाठी 40 हजारांची मागणी

सावनेर : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी खापा पोलीस ठाणे परिसरात सापळा रचुन लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायाला अटक केली . चोरी प्रकरणात अटक टाळण्यासाठी 40 हजाराची मागणी केली होती लाचची रक्कम स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले या कारवाईनंतर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
एपीआय ओम कलेगुरवार (२८) आणि शिपाई दिनेश गिरडे (३२)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघेही खापा पोलीस ठाण्यात नियुक्त आहे यातील एपीआय मूळचा चंद्रपूरचे जिल्ह्यातील राजुर याचा रहिवासी आहे तर गिरडे मुळचा दहेगाव रंगारी येथील रहिवासी आहे.

संग्रहित छायाचिठ

या प्रकरणातील 38 वर्षीय आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणात तपास कलिगुरवार याच्याकडे होता या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी 40 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती पैसे दिल्यास पीसीआर घेणार नाही आणि गाडी सुद्धा जप्त करणार असल्याचे त्याने सांगितले होते अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराने आरोपी सोबत संपर्क साधून तडजोड करीत 35 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली शुक्रवारी रक्कम देण्याचे ठरले त्यानुसार पूर्वीच ठाणे परिसरात सापळा रचण्यात आला. एपीआय कलेगुरवार ने दिनेश शिपाया मार्फत पैसे देण्यास सांगितले. तक्रारदाराने रक्कम देताच दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली. दोन्ही आरोपींना विरुद्ध खापा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

आठवळी बाजारात तरुणांच्या टोळीने तलवारी फीरवत धुमाकूळ  टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर व पोलिसांवर‌ हल्ला  पो.विभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्यावर कारवाईची मागणी 

Sat Feb 4 , 2023
आठवळी बाजारात तरुणांच्या टोळीने तलवारी फीरवत धुमाकूळ टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर व पोलिसांवर‌ हल्ला  पो.विभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्यावर कारवाईची मागणी कन्हान ता,४ फेब्रुवारी      पारशीवनी तालुक्यातील कन्हान शहरातील आठवडी बाजारात तरुणांच्या टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नागरिकांनी या घटनेचा विरोध करत राष्ट्रीय महामार्ग […]

You May Like

Archives

Categories

Meta