कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा

कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा

 

धर्मराज शैक्षणिक संस्थेची आग्रही मागणी.

कन्हान : – विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विविध शिष्य वृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक अस लेल्या कागदपत्रे तयार करावे लागतात. यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे श्री भिमराव शिंदेमेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसिलदार पारशिवनी यांच्याकडे केली आहे.

नुकतेच शैक्षणिक सत्र २०२२ – २०२३ ला सुरू वात झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त जाती व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासना तर्फे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती (अज), डॉ बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पुर्व शिष्यवृत्ती (भटक्या विमुक्त व ओबीसी), अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती (सर्व जाती), कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती या सारख्या विविध शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सप्टेंबर महिन्या पर्यंत शाळेत सादर करावे लागते. यासाठी विद्यार्थ्यांना जाती चे प्रमाणपत्र, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखले याची आवश्यकता असते. ही वेळखाऊ प्रक्रि या असल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव साद र करू शकत नाही. त्यामुळे हक्काच्या लाभा पासुन शालेय विद्यार्थी वंचित राहतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्रातील आर्थिक लाभाचे नुकसान होऊ नये यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे श्री भिमराव शिंदेमेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने पारशिवनी तहसिलदार श्री सांगळे यांच्याकडे केली. यावेळी शिष्टमंडळात धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पत्रकार श्री धनंजय कापसीकर, कांद्री ग्रामपंचायत सदस्य श्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे ग्रामीण जिल्हा संघट क श्री गणेश खोब्रागडे, मुख्याध्यापक संघाचे पदाधि कारी श्री जितेंद्र भांडेकर यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्लास्टिक पिशव्यावर बंदी करण्याकरिता नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करा- आष्टणकर

Mon Jul 4 , 2022
  प्लास्टिक पिशव्यावर बंदी करण्याकरिता नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करा- आष्टणकर नगरपरिषद येथे व्यापारी दुकानदार व प्रशासनाची बैठक संपन्न. शहरात प्लास्टीक वापरणा-या ग्राहकांवर आणि दुकानदारांना दंडात्मक कारवाई होणार. कन्हान : – केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाची अधिसुचना (दि.१२) ऑगस्ट २०२१ नुसार संपुर्ण देशात (दि.१) जुलै पासुन एकल […]

You May Like

Archives

Categories

Meta