संत नगाजी नगर येथे वृक्षरोपण थाटात  संपन्न

संत नगाजी नगर येथे वृक्षरोपण थाटात  संपन्न

 

           

कन्हान ता.4 जुलै

वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, नाभिक एकता मंच पारशिवणी तालुक्याचा वतीने श्री.संत नगाजी नगर कांन्द्री येथील आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात नाभिक समाजाच्या समाज बांधवांनी उस्फूर्त सहभाग घेतला. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जवळच्या नर्सरीतून विविध प्रकारचे झाडे मागवण्यात आली होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश लक्षणे असून प्रामुख्याने उपस्थित असेलेले शरद वाटकर यांनी वृक्ष लागवड करून वाऱ्यावर सोडून न देता निगा राखण्याची ही जवाबदारी स्थानीय पदाधिकारी यांना दिली. कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष सुनील लक्षणे यांनी केली असता जेष्ठ समाज बांधव दत्तू खडसे, गणेश वाटकर, कृष्णा दहिफळक ,रोशन बोरकर, हर्ष वाटकर, मंगेश वाटकर, छत्रपती येस्कर, महिला आघाडी च्या मीनाताई वाटकर, वाटकर काकू, समीर लक्षणे, राहुल साखरकर, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. यावेळेस संचालन आकाश पंडितकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम क्षीरसागर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

विठुरायाच्या दर्शना करिता जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना केले टोल मुक्त : मुख्यमंत्री शिंदे यांची परिपत्रक द्वारे घोषणा.

Fri Jul 8 , 2022
विठुरायाच्या दर्शना करिता जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना केले टोल मुक्त. मुख्यमंत्री शिंदे यांची परिपत्रक द्वारे घोषणा. सावनेर ता प्रा:आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या वाहनांना पथ करातून( टोल मधून) सूट देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा जुलै 2022 रोजी च्या बैठकीत संपन्न झाला या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta