श्री विठ्ठमाऊलीच्या दर्शनासाठी पदयात्रा दिंडी सोहळा

श्री विठ्ठमाऊलीच्या दर्शनासाठी पदयात्रा दिंडी सोहळा

कन्हान,ता.४ जूलै

    श्री संत शिरोमणी, श्री संत गजानन महाराज यांना श्री संत कोलवास्वामी यांच्या भेटी करीता व जगतपिता श्री विठ्ठमाऊली यांच्या दर्शनासाठी एक दिवसीय पदयात्रा सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


श्री संत गजानन महाराज मंदिर, गजानन नगर, कांद्री ग्रामवांसी द्वारे मंगळवार (दि.४) जुलै रोजी सकाळी ५ वा. श्री संत गजानन महाराज मंदिरात “श्री” चे मंगल स्नान करुन विधिवत पूजा अर्चना व भव्य महाआरती करण्यात आली.


श्री संत गजानन महाराज मंदिर येथुन भजन कीर्तनात मंत्रमुग्ध होऊन कांद्री ते श्री क्षेत्र धापेवाडा पर्यंत दिंडी सह पदयात्रा वारी काढण्यात आली. पदयात्रा राष्ट्रीय महामार्गावरील संताजी नगर हनुमान मंदिर होऊन चक्रधर पेट्रोल पंप जवळ पदयात्रेचे सांगता करण्यात आले. प्रसंगी उमेश कुंभलकर व मनोज काकडे मित्र परिवार द्वारे पालखी पदयात्रेत फुलाच्या वर्षावाने, बिस्कीट, अल्पोहार व चाय वितरण करुन स्वागत केले. पालखी पदयात्रेत दांडपट्टा, निमखेडा च्या खेळाडुंनी आपले कौशल्य दाखवून कराटे, कला, नृत्य सादर केले.

    पालखीत सहभागी झालेल्या महिलांनी फुगडी घालून आनंद उत्सव साजरा करीत पालखी व दिंडी पदयात्रा श्री क्षेत्र धापेवाडा कडे रवाना झाली.


यावेळी जिल्हा परिषद नागपुर माजी अध्यक्षा सौ.रश्मिताई बर्वे , कांद्री ग्रामपंचायत माजी सरपंच बलवंत पडोले, माजी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, माजी सदस्य राहुल टेकाम, चंद्रशेखर बावनकुळे, शिवाजी चकोले, योगराज आकरे , वामन देशमुख, गणेश सरोदे, राजेश पोटभरे, विलास घारपिंडे, सतीश झलके, सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दत्त मंदिर कांद्री येथे गुरु पौर्णिमा उत्साहात थाटात साजरा

Wed Jul 5 , 2023
दत्त मंदिर कांद्री येथे गुरु पौर्णिमा उत्साहात थाटात साजरा कन्हान,ता.४ जूलै     कांद्री वार्ड, क्रमांक दोन येथील श्री दत्त मंदीरात विधिवत पूजा अर्चना करुन विविध कार्यक्रमाने गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात थाटात पार पडला.    सोमवार (दि.३) जुलै ला गुरु पौर्णिमा निमित्य कांद्री वार्ड, क्रमांक दोन येथील श्री दत्त मंदीरात […]

You May Like

Archives

Categories

Meta