सावनेर चे नामांकित श्री.अतुल मदनराव पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

मा. अतुल पाटील यांना जन्म दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

सावनेर : 4 ऑक्टोंबरला श्री अतुल पाटील यांच्या सावनेर येथे जन्म झाला. नर्सरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे त्यांनी सावनेर येथील सुप्रसिद्ध असलेले  मॉर्निंग स्टार कॉन्व्हेंट येथून घेतले. यानंतर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी भालेराव हायस्कूल व एमसीवीसी येथून घेतले. खेळात मोठ्याप्रमाणात आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या शालेय जीवनात क्रीडा क्षेत्रामध्ये मोठे नाव कमावले. यामध्ये त्यांनी मैदानी स्पर्धेमध्ये भाग घेऊन राज्यस्तरीय पर्यंत त्यांनी आपल्या आई वडिलांचे शाळेचे व गुरुजनांचे नाव लौकिक केले.

त्यानंतर सावनेर येथील  महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर हरीभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालय येथून आपले पदवीधर शिक्षण संपूर्णपणे घेतले. पदवीधर शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये नागपूर विद्यापीठामध्ये आपले नाव कोरले. श्री अतुल पाटील यांचे वडील व्यवसायिक असल्यामुळे त्यांचे सावनेर येथे फार जुने असे पाटील जनरल अँड हार्डवेअर तसेच पाटील पुस्तकालय या नावाचे दुकान असून आज ते हे दुकान सांभाळीत आहे. श्री अतुल रावांची लग्न झाले असून त्यांना दोन पृथ्वी आणि वीर या नावाची मुल आहेत.

अतुलराव हे सावनेर व्यापारी संघाचे कोषाध्यक्ष असून व्यापारी संघामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी सुद्धा खेळातील रुची संपलेली नसून दोन वर्ष अगोदर झालेल्या सावनेर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्यांनी एकेरी स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये नागपूरच्या राज्यस्तरीय खेळाडूला उत्कृष्ट अशी स्पर्धा दिली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गुरुजनांनी त्यांना फोन करा शुभेच्छा दिले आहेत तसेच राज्याचे क्रीडा मंत्री मा श्री सुनील केदार, व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री विनोद जैन, सचिव श्री मनोज बसवार, सदस्य श्री नरेंद्र जी वाघेला ,सुमुख लाखानी व इतर सर्व व्यापाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महाराष्ट्र दर्पण न्यूज पोर्टल वर युट्यूब चॅनलतर्फे मान्य. श्री अतुल मदनराव पाटील यांना वाढदिनाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचाली करिता भरघोस शुभेच्छा 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी ६ आॅक्टोंबर रोजी ढोल बजाओ आंदोलन :महाज्योती बचाव कृती समिती

Sun Oct 4 , 2020
*भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी ६ आॅक्टोंबर रोजी ढोल बजाओ आंदोलन* *राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार* *महाज्योती बचाव कृती समितीची घोषणा* कन्हान ता.4 ऑक्टोबर ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी व विविध प्रश्नासाठी ६ आॅक्टोंबर २०२० रोजी राज्यव्यापी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा महाज्योती बचाव कृती समितीचे राज्य संघटक, भटक्या विमुक्तांचे […]

Archives

Categories

Meta