लहान वयातच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे द्या- मिलिंद वानखेडे  धर्मराज प्राथमिक शाळेत स्वयंरोजगाराचा बालआनंद मेळावा

 

लहान वयातच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे द्या- मिलिंद वानखेडे

धर्मराज प्राथमिक शाळेत स्वयंरोजगाराचा बालआनंद मेळावा

कन्हान,ता.०४ जानेवारी

    शालेय जिवनात शिक्षणासोबत स्वयंरोजगाराचे धडे गिरवले तर येणारी पिढी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी होईल. त्यामुळे बालवयातच स्वयंरोजगाराचे धडे दिले पाहिजे, असे आवाहन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.

     धर्मराज प्राथमिक शाळेत आज (ता.४) स्वयंरोजगारक्षम बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन नागपूर विभागाचे शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय कापसीकर, मुख्याध्यापक खिमेश बढिये, आॅटो युनियनचे अध्यक्ष गज्जू बल्लारे, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम, आॅटो युनियनचे सदस्य मुकुंद उंबजकर, चंद्रशेखर मोटघरे उपस्थित होते. यावेळी चिमुकल्यांनी तब्बल ६० स्टाॅल लावून आपल्या पाककृतीचा आस्वाद मुलांना दिला. या बाल आनंद मेळाव्यात पाणीपुरी, भेळ, समोसा, कचोरी, गुलाब जामून, गाजर हलवा, रवा लाडू, कांदा भजी, आलू भजी, सॅन्डविच, ब्रेड पकोडे, पुरीभाजी, चनापोहा, चहा, पावभाजी, पिंगर, डोसा, अप्पे, इडली, लसून पराठा, झुनका भाकरी, साबुदाणा वडा, उकडलेले बोर, ऊस, ढोकळा, कच्चा चिवडा, लिंबू सरबत या सारख्ये विविध व्यंजनाचे स्टाॅल लावण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी व शिक्षकांनी चिमुकल्यांच्या या धाडसी संस्कारक्षम स्वयंरोजगाराचे कौतुक करीत भविष्यात मोठे उद्योजक बनावे अशा शुभेच्छा दिल्या.

     या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन कु. हर्षकला चौधरी व कु.अर्पणा बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिमराव शिंदेमेश्राम, राजू भस्मे, अमित मेंघरे, किशोर जिभकाटे, सौ. चित्रलेखा धानफोले, कु.शारदा समरीत, कु.प्रिती सुरजबंसी, कु.पूजा धांडे, कु कांचन बावनकुळे, सौ.वैशाली कोहळे, दिनेश ढगे, सतीश राऊत, तेजराम गवळी,नरेंद्र कडवे, सौ. छाया कुरुटकर, सौ कोकीळा सेलोकर, सौ.माला जिभकाटे, प्रशांत घरत, सौ.सरीता बावनकुळे, संजय साखरकर, सौ.सुनीता मनगटे, सौ.सुलोचना झाडे, सौ.नंदा मुद्देवार, सौ.संगीता बर्वे यांनी सहकार्य केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजे फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर

Thu Jan 5 , 2023
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजे फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर कन्हान,ता.४ जानेवारी      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्था, टेकाडी द्वारा संचालित राजे फाउंडेशन वतीने रक्तदान शिबिर टेकाडी गावात घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित सरपंच विनोदी इनवाते तर प्रमुख उपस्थिती माझी ग्रामपंचायत सदस्य […]

You May Like

Archives

Categories

Meta