सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजे फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर
कन्हान,ता.४ जानेवारी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्था, टेकाडी द्वारा संचालित राजे फाउंडेशन वतीने रक्तदान शिबिर टेकाडी गावात घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित सरपंच विनोदी इनवाते तर प्रमुख उपस्थिती माझी ग्रामपंचायत सदस्य दिनेश चिमोटे यांनी दर्शविली. रक्तदान शिबिराला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे व सतीश घारड यांनी भेट दिली. एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी राजे फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन बुराडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना, केतन भिवगडे सचिव महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना, अभिजीत चांदुरकर कोषाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, अतुल कोटकर अभिजीत कुरडकर ददू कुरडकर प्रशांत टाकरखेडे चंदू नाकतोडे पवन हूड अमित वासाडे आदी उपस्थित होते.