शहर काँग्रेस तर्फे माजी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत

शहर काँग्रेस तर्फे माजी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत

सावनेर : नुकत्याच पार पडलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे सावनेर कळमेश्वर विधानसभेचे आमदार व माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या सावनेर आगमना निमित्त शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करित पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .


माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांच्या कुशल व्यूहरचनेमुळे आधी पदवीधर मतदारसंघ व आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारां पराभवाचा सामना करावा लागला.त्यामुळे राज्यातील काँग्रेस व मित्रपक्ष व महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल, युवक काँग्रेस सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे, व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार, माजी नगरसेवक सुनील चाफेकर, नीलेश पटे, लक्ष्मीकांत दिवटे, तेजसिंग सावजी, शफिक सय्यद  युवा कार्यकर्ते श्याम चव्हाण, अश्विन करोकर, मोहित बारस्कर, मुकुंद नाईक, आदी प्रमुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान आणि आरोग्य शिबीर नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा‌ - डॉ.शशांक राठोड

Wed Feb 8 , 2023
 प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान आणि आरोग्य शिबीर नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा‌ – डॉ.शशांक राठोड कन्हान,ता.८फेबुवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचा आदेशानुसार ९ फेब्रुवारी ला राज्यभरात सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी महारक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.     […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta