बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ

बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ

सावनेर : सावनेर पांढुर्णा रोडवरील हेटी शेवर येथे नर बिबट्या मु्त अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली असून मु्त बिबट्या पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली.
4 मार्च रोजी सकाळी 11-00 वाजेच्या सुमारास सावनेर पांढुर्णा येथील हेटी शिवारात नर बिबट्या मु्त अवस्थेत असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळुक तसेच हितज्योती फाऊंडेशनचे हितेश बंन्सोडला कळताच त्यांनी सदर माहिती वनपरिक्षेत्र खापा व कळमेश्वर यांना दिल्यानंतर सावनेर पोलीस ठाण्याचे मारुती मुळूक व हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांनी घटनास्थळ गाठले. तसेच सदर वनपरिक्षेत्र कळमेश्वर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने कळमेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती नौकरकर यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचून पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपासासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय, सावनेर रवाना करण्यात आले.


मागील एक वर्षापासून कळमेश्वर वन परिक्षेत्रातील निळगाव, बोरगाव, तेलगाव, हेटी, केळवद वन परिक्षेत्रातील जटामखोरा,बीडगाव,रायबासा कोदेगाव, या परिसरात बिबट्या धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी प्रत्यक्षदर्शी शेतकरी बांधवांनी करुण धुमाकूळ घालणार्या बीबट्यास दुसरीकडे जंगलात सोडण्यात तिन्ही वनपरिक्षेत्रातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वनविभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळी केला.
दि.4 मार्च 2024 रोजी उघडकीस आलेल्या या घटनेत बिबट्याचा मृत्यू कसा झाला, हे शवविच्छेदनानंतरच कळेल की, तो शिकारीमुळे झाला, की शेताच्या बांध्याला विजेचा शाँक मुळे की कुणी अज्ञात वाहनाच्या धडकीने त्याला मार लागला. या दिशेने सद्या तपास सुरु असुन मु्त बिबट्याच्या शवविच्छेदन अहवालानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल अशी माहीती कळमेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती नौकरकर यांनी दीली.
तर हितीज्योती फाऊंडेशन चे हितेश बंन्सोड, अभिषेक भगत, अभिषेक सातपुते गाव हेटी पोलीस पाटील गहरवार आदींच्या सहकार्याने बिबट्याचा मृतदेह पशुवैद्यकीय रुग्णालय सावनेर येथे पाठविण्यास मदत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

होळीच्या पहील्या दिवशी युवकावर चाकू हल्ला  कन्हान कीती सुरक्षित पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

Mon Mar 6 , 2023
होळीच्या पहील्या दिवशी युवकावर चाकू हल्ला कन्हान कीती सुरक्षित पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह ? कन्हान,ता.०६ मार्च      राहुल सलामेच्या मृत्यूने वातावरण तापले असताना आंबेडकर चौक, कन्हान येथे युवकावर चाकू हल्ला झाल्याची रविवारी रात्री धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळखळ उडाली. परत एकदा होळीच्या पहील्या दिवशी पोलीस प्रशासनाचा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta