सावनेर पब्लिक स्कुल बाबत अफवा पसरवनाऱ्यांवर होणार कारवाई

सावनेर पब्लिक स्कुल बाबत अफवा पसरवनाऱ्यांवर होणार कारवाई..
*सावनेर पब्लिक स्कुल कोरोटाईन सेंटर नसून कोविड -१९ सेंटर होते : गटविकास अधिकारी

सावनेर:- सावनेर पब्लिक स्कुल सावनेर जिल्हा नागपूर ही अतिशय चांगले शिक्षण देणारी सावनेरातील शिक्षण संस्था आहे या शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असून परिसर मोकळा व प्रशस्त आहे, त्यामुळे प्रशासनाने सावनेर तालुक्यात बाहेर गाव व बाहेर राज्यातून येणाऱ्या तालुक्यातील सर्व लोकांची कोविड -१९ अंतर्गत तपासणी व्हावी यासाठी ही शाळा मार्च-एप्रिल २०२० मध्ये अधिग्रहित केली होती.यामुळे अनेक व्यक्तींच्या तपासण्या करणे शक्य झाले याचा फायदा तालुक्यातील लोकांना झाला.. या तपासणीत कोविड-१९ ची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना नागपूर मेडिकल किंवा मेयो येथे पाठविण्यात आले होते मात्र लक्षणे आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या शाळेत निवासी ठेवण्यात आले नव्हते या शाळेत फक्त तपासणी केंद्र कार्यरत होते.. सावनेर पब्लिक स्कुलचे वारंवार स्वच्छ व फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले या साठी शाळेचे व्यवस्थापन, प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.. तदवत शासनाच्या कार्यात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी म्हणून जनतेला दिलासा दिला.. तरीही काही विघ्नसंतुष्टी व्यक्ती सोशल मीडियावर शाळेबाबत विनाकारण हेतुपुरस्पर अफवा पसरवत आहेत हे गैरकायदेशीर कृत्य आहे अशा व्यक्ती विरुद्ध पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल…
महाराष्ट्रातील किंबहुना सावनेर तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालये कोविड-१९ साठी प्रशासनाने अधिग्रहित केले होते त्या सर्व संस्था पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आल्या आहेत यामुळे पालकांनी व पाल्यांनी शाळे बाबत कोणतीही भीती बाळगू नये..असे आव्हान सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी स्थानिक पत्रकार परिषदेत दिली..

सावनेर पब्लिक स्कुल संस्थेने प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले या शाळे मध्ये केवळ स्वँब टेस्टिंग झाले आहे इथे नियमितपणे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जाते.. त्यामुळे ही संस्था संपूर्ण सुरक्षित असल्याची सर्वांनी खात्री बाळगावी…
अनिल नागणे
(गटविकास अधिकारी सावनेर )

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिपक गरुड,गटशिक्षणधिकारी विजय भाकरे,शाळेचे संचालक रत्नाकर डाहाके,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्ताभाऊ धोटे,मुख्याध्यापिका ममता अग्रवाल,वैशाली देशपांडे, चंदु कोमुजवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

*वनमंत्री तथा पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप कार्यक्रम संपन्न*

Sun Jul 5 , 2020
*”वनमंत्री तथा पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप कार्यक्रम संपन्न*”  घाटंजी : शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे सेवन प्रभावी ठरते. त्यामुळे पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घाटंजी तांड्याच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta