राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र संघास रौप्य पदक

राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र संघास रौप्य पदक

# ) नागपुर जिल्ह्याचे अमित राजेन्द्र ठाकुर, चिन्मय भगत व हर्षल बढेल यांचा समावेश. 


कन्हान : –   टग ऑफ वाॅर फेडरेशन ऑफ इंडिया व टग ऑफ वाॅर असोसिएशन राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या ३४ व्या राष्ट्रीय रस्सीखेच  स्पर्धेत महाराष्ट्र संघाने खुल्या वजन गटात रौप्य पदक प्राप्त केले. यात नागपुर जिल्ह्याचे अमित राजेंद्र ठाकूर , चिन्मय सुनिल भगत व हर्षल हुकुमचंद बढेल या खेळाडुंचा सहभाग होता.

       नोखा, जिल्हा बिकानेर, राजस्थान येथे दिनांक २९ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर दरम्यान झालेल्या ३४ व्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाने उपांत्य सामन्यात राजस्थान संघाचा पराभव केला. मात्र अंति म सामन्यात दिल्ली संघास जिंकण्यासाठी असमर्थ ठरल्याने दिल्ली संघा कडुन २-१ फरकाने पराभव स्विकारावा लागला. महाराष्ट्र संघा कडुन ६४० किलो वजन गटात सहभागी झालेले क्षितिज सिरीया, रुद्रांश मनोज मरघडे, हेमंत मनोज सिंग चव्हाण, शिवम रमाकांत पिपरोडे व ईशांक सुशील तेलंग यांनी सुद्धा साखळी सामन्यात चंदिगड, पांडेचरी व ओरिसा या संघाचा पराभव करून उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र पंजाब व हरियाणा कडुन पराभुत झाल्यामुळे उपांत्य सामन्यात सहभागी होऊ शकले नाही. महाराष्ट्र टग ऑफ वाॅर असोसिएशन अध्यक्षा माधवी पाटील, महासचिव जनार्दन गुपिले, दि टग ऑफ वाॅर असोसि एशन नागपुरचे अध्यक्ष सुनीलभाऊ केदार, उपाध्यक्ष लक्ष्मण राठोड, सचिव धैर्यशील सुटे, कोषाध्यक्ष बबलु सोनटक्के, सहसचिव राजकुमार परिहार, आशिष उपासे, ओमप्रकाश आकोटकर व नितेश घरडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

लॉयन्स क्लब , सावनेर व्दारे अन्नदाता सुरक्षा अभियानाचा थाटात शुभारंभ

Sun Sep 5 , 2021
लॉयन्स क्लब , सावनेर व्दारे अन्नदाता सुरक्षा अभियानाचा थाटात शुभारंभ सावनेर : शेतकरी बांधव पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक रासयनिक किटनाशक व तननाशकांचा उपयोग करतात . परंतु दरवर्षी अशी फवारणी करतांना निष्काळजीपणा केल्यामुळे अनेक शेतकरी शेतमजुरांना विषबाधा होते , प्रसंगी प्राण सुध्दा गमवावा लागतो . या गंभीर समस्येची जाणीव ठेवून लॉयन्स […]

You May Like

Archives

Categories

Meta