*पालोरा येथे बाईक ची बैलगाडी ला टक्कर ,बाईक चालक घटना स्थळी मृत, बैल गंभिर जख्मी*
कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी

पाराशिवनी(ता प्र) :- पारशिवनी पोलीस स्टेशन च्या हदीत आमडी -पारशिवनी रोड पालोरा येथे गावातील ढाब्या जवळ शेतातुन पाराशिवनी कडे बेलगाड़ी चालक टिगनें हा बैलगाडी घेऊन जात असताना
अंधारात बाईक स्वार यांना समोरची बैलगाडी दिसली नाही परिणामी झालेल्या अपघातात दुचाकी चालक घटना स्थळी मृत पावला, पाराशिवनी तालुका पालोरा गाव जवळ मंगळवारी (३नवंबर) रात्री सात वाजता सुमारास घडली रोशन शेषराव शेंद्रे वय 25 वय वर्षे राहणार पालोरा असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे घटनेच्या दिवशी तो काम असल्याने जात होता तेव्हा त्याची दुचाकी पालोरा चे ढाब्या जवळ असताना मागुन बैलगाडीवर जाऊन धडकली समोर बैलगाडी आहे याची कल्पना आली नाही परिणामी वेगात असलेली गाडी मागून बैलगाडीवर आढळल्याने तो गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच पाराशिवनी पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक संदिपन उबाळे सह अमोल मेघंरे घटनास्थळी दाखल झाले त्याने सर्व प्रथम पंचनामा करून मृत झालेल्या रोशनला दवाखान्यात पाठवले, पुढची तपास उप निरिक्षक संदिपन उबाळे करित आहे ,पोलीस उप निरिक्षक यानि सागीतले कि परिसरात दुचाकीचे अपघात वाढले आहे वेगाने नियंत्रण नसल्याने अशा स्वरुपात अपघात वाढण्याची उबाळे यांनी दिली