वेकोलि व्दारे नविन गोंडेगाव पुनर्वसन कामात अनियमिता, अनेक त्रुटी

वेकोलि व्दारे नविन गोंडेगाव पुनर्वसन कामात अनियमिता

#) जिल्हाधिकारी व्दारे गठित समितीने तब्बल ५ तास नवीन गोंडेगाव ची केली पाहणी. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : –  वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान व्दारे खुली कोळसा खदान प्रस्ताविक विस्तारणाकरिता गोंडेगाव येथील नागरिकांना वेठीस धरत असल्याने मा जिल्हाधिकारी व्दारे गोंडेगाव च्या योग्य पुनर्वस ना करिता गठीत पुनर्वसन समितीने नविन गोंडेगाव ची तबल ५ तास पाहणी केली असता गोंडेगाव पुनर्वसन कामात भरपुर अनियमिता आढळल्याचा मा जिल्हाधिका-यांना समितीचा अहवाल सादर करण्याचे समिती अध्यक्ष मा जोगेंद्र कटियारे हयांनी रमेश कारेमोरे व प्रकल्पग्रस्त गावक-यांना सांगितले.    

           जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे वेकोलि गोंडेगावं खुली कोळसा खदान प्रस्तावित विस्तारणा करिता गोंडेगांव गावाचे पुनर्वसन करण्यात येत आहे.  मात्र ज्या जागी गांव वसविले जात आहे तिथे मोठ्या प्रमाणात अनियमिता, अव्यवस्था असल्याने अनेक विकासकामे अपुर्ण व निकुष्ठ दर्जाची आहेत. आवश्यकतेपेक्षा कमी व नियमानुसार भुखंड नसल्याने अनेक नागरिकाना वंचित करण्यात आले. प्रकल्पग्रस्त गाव क-यांना योग्य मोबदला, स्थायी नौकरी सह स़्थानिय  बेरोजगार तरुणांना रोजगारा पासुन डावळण्यात आले आहे. असे अनेक विषय प्रलंबित असताना वेकोली अधिकारी वारंवार गाव खाली करून कोळसा खदान चे काम सुरू करण्यास गावक-यांना वेठीस धरत असत्यामुळे सतत २ वर्षापासुन रमेश कारामोरे, ग्रा पं पदाधिकारी हे प्रकल्प ग्रस्तांच्या न्याय हक्काकरिता वेकोलि व प्रशासनास तक्रारीच्या निवारणाकरिता पाठपुरावा करित असुन दि.९ ऑक्टोबंर ला प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख रमेश कारेमोरे च्या नेतुत्वात गोंडेगाव पुनर्वसन तक्रारीचे निवारण करून योग्य पुनर्वसन करण्याकरिता आंदोलनाचा इशारा दिला होता. यास्तव मा.जिल्हाधिकारी हयांनी छत्रपती शिवाजी सभागृह नागपुर येथे शुक्रवार (दि.२३) ऑक्टोबंर ला २ वाजता मा बच्चु भाऊ कडु राज्यमंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास व इतर बहुजन कल्याण विभाग यांचे अध्यक्षेत मा रविंद्र ठाकरे जिल्हा धिकारी नागपुर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रमेश कारेमोरे, जोगेंद्र कटियारे उपविभागीय अधिकारी रामटेक, वरूणकुमार सहारे तहसिलदार, वेकोली क्षेत्रिय प्रबंधक, सीएमडी यांचे प्रतिनिधी, नितेश राऊत गोंडेगाव सरपंच आदीच्या बैठकीत मा राज्यमंत्री मा बच्चु भाऊ कडु हयांनी अधिका-यांना गोंडेगाव पुनर्वसन समिती गठीत करून तक्रारीचे निवारण करून त्वरित योग्य पुनर्वसन करावे. या आदेशान्वये मा जिल्हाधि कारीनी उपविभागीय अधिकारी रामटेक च्या अध्यक्षतेत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र प्रबंधक, तहसिलदार पारशिवनी, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग, खंड विकास अधिकारी पारशिवनी, मंडळ अधिकारी, आंदोलनकर्ते रमेश कारामोरे, गोंडेगांव  सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे व ग्रा पं सदस्य यांची समिती गठित करून नवीन गोंडेगाव ला भेट देऊन तेथील समस्यांचा संयुक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने समितीने बुधवार (दि.४) ला नवीन गोंडेगांव येथे प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामे व असलेल्या तक्रारीची प्रत्यक्ष तबल पाच तास पाहणी केली .यावेळी रमेश कारामोरे व सरपंच नितेश राऊत व गावकर्यानी समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी श्री जोगेंद्र कटियारे व इतर समिती सदस्य अधिकारी यांचे समोर वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानच्या बोगस कारभाराचा बुरखा फाडत चांगलेच धारेवर धरले. यामुळे समिती अध्यक्ष यांनी उद्याच जिल्हाधिकारी यांना या सर्व अनियमितता चां अहवाल तयार करून सादर करण्यात येईल अशी माहिती रमेश कारामोरे व प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांना दिली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा

Thu Nov 5 , 2020
कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा #) १६ संशयिताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८५२.     कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे १६ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह रूग्ण आढळुन दिलासा. कन्हान […]

You May Like

Archives

Categories

Meta