सावळी येथे साडे पाच लाखाची घरफोडी

 

*सावळी येथे साडे पाच लाखाची घरफोडी. पारशिवनी पोलीसांचे चोराना पकडण्यास दोन पथक रवाना. , प्रभारी निरिक्षक गोहाणे यांची माहिती*

कमलसिंह यादव
पार्शिवनी तालुका प्रतिनिधी

पारशिवनी (ता प्र) :-तालुका ॥तिल सावळी येथे माजी सरपंच नरेन्द्र बल्की याचे घरी चोरानी घरा चे मागुन स्वंयपाक घराच्या दाराची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. व घरातील आलमारीचे कुलूप तोडून लॉकरमध्ये असलेले २0 तोळे सोने व दीड लाख रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना पारशिवणी पासून ११ किमी अंतरावरील सावळी येथे मंगळवारी (३ नोव्हेंबर) रात्री १ च्या दरम्यान घडली.
नरेंद्र बलकी हे आपल्या परिवारास मंगळवारी घरी बेडरूममध्ये झोपले होते. ते रात्री १२ पर्यंत टीव्ही वरील बातम्या पाहत होते. त्यानंतर ते झोपी गेले. ते पहाटे ३ वाजता पाणी पिण्याकरिता उठले असता त्यांना त्यांच्या बेडरूममधील आलमारी उघडी दिसली व सामान विखुरलेले दिसले. त्याचवेळी घरातील आलमारीतील लॉकर उघडे दिसले. त्यांनी घरच्या सर्व लोकांना उठविले व गावातील लोकांना चोरीची घटना सांगितली. चोरांनी आलमारीचे ड्रावर व घरातील बॅग घराशेजारील शेतात फेकले होते. चोरांनी २0 तोळे ३ ग्राम सोने, व दीड लाख रुपये नगदी, असा ऐवज चोरून नेला. ही घटना अंदाजे मंगळवारी रात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी डॉग स्कॉड व पारशिवनी पोलिस पोहोचले. चोरांनी गुंगीचा स्प्रे मारून सदर चोरी केली असावी, अशी दाट शक्यता आहे. नरेंद्र बलकी हे सावळी येथील माजी सरपंच आहे. त्यांच्या घरी वडिलोपार्जित सोने होते. बल्की यानी दशरा चे पुजा साठी दागिने काढ़ले होते, पारशिवनी तालुक्यात मागील महिन्यात ७ घरा चा ठिकाणी याच पद्धतीने चोर्‍या झाल्या. आद्यापदेखील चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. प्रभारी पुलिस निरिक्षक गोहाणे तपास करित आहे प्रभारी निरिक्षक गहाणे यानी चोराचा शोध घण्या साठी दोन पथक तयार केले असुन ते शोध घेत आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर मागील चोरीच्या घटनेतील अज्ञात आरोपी आतापर्यंत पारशिवनी पोलिसांना शोधून काढण्यात अपयश आल्याने चोरांची हिम्मत अधिकच वाढली असल्याने या चोरीच्या घटना मोठय़ाप्रमाणात वाढत आहे, असा कयास लावला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

डुमरी शिवारात दोघाना मारहाण करून लुटले

Sat Nov 7 , 2020
डुमरी शिवारात दोघाना मारहाण करून लुटले कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील डुमरी वस्ती शिवारात दुचाकीच्या दोघांना तिन लोकांनी येऊन मारहाण करून त्याच्या जवळील दोन मोबाईल, सोन्याच्या बाळया व नगदी असा २४ हजार आठसे रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने घेऊन पसार झाले. कन्हान पोलीसांनी तीनही आरोपीना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत […]

You May Like

Archives

Categories

Meta