आंबेझरी येथील शाळा वेवस्थापण समिती अध्यक्षपदी राजेश सदाशिवराव आडे बिनविरोध

*आंबेझरी येथील शाळा वेवस्थापण समिती अध्यक्षपदी राजेश सदाशिवराव आडे बिनविरोध*
घाटंजी : दि.०४/१२/२०२१ शनिवार रोजी,जी.प.शाळा आंबेझरी येथे नवीन शाळा व्यवस्थापन समिती ची स्थापना करण्यात आली.सदर कार्यक्रमाला सर्व पालक वर्ग व गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.सर्वप्रथम सर्व पालकमधून सर्व सदस्यांची नेमणूक करण्यात आली.व नंतर सदस्यांनी त्यांच्यामधून बिनविरोध अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली.सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शक व कोरोना नियमांचे पालन करून घेण्यात आली.सदर कार्यक्रमात माजी अध्यक्ष श्री.भूषणभाऊ मेश्राम यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक श्री.किसनराव आडे काका, श्री. पेंदोर काका,श्री.मेश्राम काका, श्री.संतोषभाऊ गोर्लेवार,श्री.निळूभाऊ राठोड(सरपंच), आदी मंडळी व सर्व पालक वर्ग उपस्थित होते.नवीन शाळा व्यवस्थापन समिती पुढीलप्रमाणे स्थापन करण्यात आली..श्री.राजेश आडे (अध्यक्ष),श्री.वासुदेव सलाम (उपाध्यक्ष ),श्री.चरण भाऊ राठोड,श्री.शिवलाल राठोड,श्री.प्रेम राठोड..(सदस्य).,श्री.गजानन आत्राम (शिक्षण तज्ज्ञ.),तसेच सौ.शारदा ताई विजय गोर्लेवार,सौ.मंजुळा ताई भास्कर धूर्वे,सौ.हीना ताई संदीप चव्हाण,सौ.मालती ताई हितेश जाधव,सौ.संगीता ताई दशरथ राठोड,सौ.सुचिता ताई भूषण मेश्राम (सदस्या.).,यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नगराळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. किनाके सर यांनी केले.शेवटी श्री.भूषण भाऊ मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व वंदे मातरम् घेवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे संविधन चौक येथे महामानव परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Wed Dec 8 , 2021
बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे संविधन चौक येथे महामानव परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कामठी : मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी दिक्षा भुमी येथे केली विशेष बुध्द वंदना बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापिका मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख […]

You May Like

Archives

Categories

Meta