एकता मंच कन्हान सलुन दुकानदार संघाची कार्यकारणी जाहीर

एकता मंच कन्हान सलुन दुकानदार संघाची कार्यकारणी जाहीर

             अध्यक्ष किशोर गाडगे तर सचिव सुधिर पुंडे

कन्हान,ता.४: डिसेंबर

      कोरोना काळा पासुन प्रलंबित असलेली दुकानदार कार्यकारणी सोमवारी महाकाली कॉम्लेक्स कन्हान येथे शहरातील समस्त सलुन दुकानदार एकत्र येऊन सर्वानुमते अध्यक्ष पद्दी किशोर गाडगे तर सचिव सुधिर पुंडे ची निवड करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

    सोमवार (दि.५) डिसेंबर महाकाली कॉम्लेक्स कन्हान येथे एकता मंच कन्हान सलुन दुकानदार संघा व्दारे शहरातील समस्त सलुन दुकानदारांची बैठक घेण्यात आली. यात मागील असोसिएशन चा नियमित शेवटचा सोमवार बंद ला शिक्का मोर्तब करण्यात आला. नाभिक नेते नरेश लक्षणे, ओबीसी नेते शरद वाटकर यांचे हस्ते नवनियुक्त अध्यक्ष किशोर गाडगे व सचिव सुधिर पुंडे यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून कार्यकारणी अध्यक्ष- किशोर गाडगे, सचिव सुधीर पुंडे, कार्याध्यक्ष दत्तु खडसे, मार्गदर्शक राजु सूर्यवंशी, उपाध्यक्ष छत्रपती येस्कर, भगवान कावळे, सहसचिव संदीप माहुलकर, रोशन बोरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र घोटेकर, सहकोषाध्यक्ष अजय चन्ने, प्रचार प्रमुख प्रफुल आगाशे आदीची नियुक्ती करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष दहिफळकर यांनी तर आभार मिथुन सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. प्रसंगी प्रशांत लक्षणे, सुनील उंबरकर, पुंड साहेब, अरमान अंजनकार, गोपाल लाडेकर, आकाश चौधरी, पिंटु निंबाळकर, अनकर बंधु, राकेश ठाकुर, आकाश पंडितकर आदी नाभिक समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्री येथे एका युवकावर धारधार चाकूने हल्ला

Mon Dec 5 , 2022
कांद्री येथे एका युवकावर धारधार चाकूने हल्ला कन्हान,ता.५ : डिसेंबर      कन्हान परिसरात आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीचे चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर संताजी नगर, कांद्री येथे पाच युवकांनी संगमत करुन युवकावर चाकुने प्राण घातक हल्ला करुन गंभीर जख्मी केल्याने विरेंद्र यादव यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta