होळीच्या पहील्या दिवशी युवकावर चाकू हल्ला  कन्हान कीती सुरक्षित पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

होळीच्या पहील्या दिवशी युवकावर चाकू हल्ला

कन्हान कीती सुरक्षित पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

कन्हान,ता.०६ मार्च

     राहुल सलामेच्या मृत्यूने वातावरण तापले असताना आंबेडकर चौक, कन्हान येथे युवकावर चाकू हल्ला झाल्याची रविवारी रात्री धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळखळ उडाली. परत एकदा होळीच्या पहील्या दिवशी पोलीस प्रशासनाचा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

     मिळालेल्या माहिती नुसार, रविवार (दि.५) मार्च ला रात्री अकरा वाजता च्या दरम्यान आंबेडकर चौक येथे तीन युवकाचा आपसात वाद- विवाद झाला. विवाद इतका विकोपाला गेला की, एका युवकाने सागर यादव रा.कांद्री याचा छाती लगत धारदार चाकूने सपासप दोन वार करुन गंभीर जखमी केले. जखमी सागर याने स्वतः ला वाचविण्या करीता घटनास्थळावरुन पळ काढला. अज्ञात आरोपीने त्याला जीवे मारण्याचा उद्देशाने पाठलाग केला परंतु जख्मी सागर हाथी न लागल्याने थोडक्याात प्राण वाचले.

    सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी कन्हान पोलीसांना दिली. कन्हान गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशंवत कदम, सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम , वैभव बोरपल्ले, हरिष सोनभ्रदे , महेंद्र जळीतकर हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी पोहचले. नागरिकांनी सागर तारसा चौक च्या दिशेने पळाल्याचे सांगिल्याने पोलीसांनी शोधा शोध सुरू केली. सागर यादव स्ट्रेट बैंक समोर मिळुन आल्याने पोलीसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.‌ मात्र डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन मेयो रुग्णालय नागपुर येथे हलविण्यात आले. सदर घटना गंभीर्याने घेत उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन फरार आरोपींचा शोध घेत अधीक तपास कन्हान पोलीस करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सुरक्षा रक्षकाला मारल्याने महीलांवर गुन्हा दाखल 

Mon Mar 6 , 2023
सुरक्षा रक्षकाला मारल्याने महीलांवर गुन्हा दाखल कन्हान,ता.०५ मार्च      ईगल इंफ्रा प्रायवेट लिमिटेड खदान नं. सहा येथे दहा ते बारा महिलांनी कंपनीचा आत जबरदस्तीने प्रवेश करुन कर्तव्य बजावत असलेला सुरक्षा रक्षकाला कानशीलात झापड मारत, जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीसांनी परशुराम गौतम यांच्या तक्रारी वरून दोन महिला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta