रेल्वे मालधक्का स्थानांतरण करण्यासाठी ठीया आंदोलन  

रेल्वे मालधक्का स्थानांतरण करण्यासाठी ठीया आंदोलन

कन्हान,ता.०५ मार्च

     कन्हान शहरातील मुख्य गवहीवरा टी पॉइंट,चौकात असलेला रेल्वे माल धक्कया मुळे स्थानिक नागरिकांसह, लहान‌ मुलांना व वृद्ध व्यक्तींना‌‌ मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धुळीचा विविध आजारांची समस्या निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर वाहतूक थांबवून ठीया आंदोलन केले.

      मालधक्का, कन्हान येथे चालत असलेल्या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होतो. ज्या कारणाने स्थानिक नागरिकांना अस्थमा, दम लागणे , त्वचा शारीरिक व मानसिक तणावात जगत अशा अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. या सर्व गंभीर विषयांचा विरोधात शिवशंकर (चिंटू) वाकुडकर व स्थानिक नागरिकांनी मालवाहतूक ट्रक रस्त्यावर थांबवून गेट समोर ठीया आंदोलन केले. स्थानिक आंदोलन करत्यानी ठेकेदार यांना फटकार लावल्या नंतर ठेकेदार यांनी त्वरित ट्रॅकर आणून धूळ दूर करण्याचे प्रबंध केले.

 परत ही समस्या उद्भवल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल अशी चेतावनी दिली. माल धक्का स्थित असलेला क्षेत्र हा निवासी क्षेत्र असून याला कायमस्वरूपी स्थानांतर करण्याची मागणी जोर धरण्यात आली. जेणे करून स्थानिक नागरिकांना धुळीचा व विविध आजाराचा सामना करावा लागणार नाही.

  यावेळी आंदोलन शांत करण्यासाठी कन्हान पोलीस अधिकारी व रेल्वे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मध्यस्थी भुमीका घेऊन आंदोलन शांत करण्यासाठी ‌विनंती केली. समस्यांचा निवारण करण्याकरिता अधिकाऱ्यांना काही वेळ देण्याची मागणी केली. जो पर्यन्त रेल्वे माल धक्का येथून स्थानांतरण होणार नाही. तेव्हा पर्यन्त स्प्रिंकलर लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर स्प्रिंकलर ची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त दिले.

प्रसंगी आंदोलनात स्वप्निलजी मते, शेखर बोरकर, रवि महाकालकर, चिंटू वाकुळकर, भगवान गजभिये,‌ तुलशिराम चहांदे, मानकर सर, गोंल सर, अर्चनाताई गजभिये, छायाताई सवाईतूल, सूर्यवंशी, कल्पना बागड़े, कामड़े ताई ,पुष्पा गजभिये, पडोळे ताई, ठाकरे ताई, शिंदे ताई, निर्मलाबाई चौधरी, सुरेश चौधरी, पुण्ड ताई, इखार ताई, पवनिकर ताई व मोठ्या संख्येत स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अखेर जख्मी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु  गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचे वर्चस्व निर्माण होणार काय?

Mon Mar 6 , 2023
अखेर जख्मी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचे वर्चस्व निर्माण होणार काय? कन्हान,ता.०६ मार्च       शहरातील वाढत्या बेरोजगारीमुळे व्यसानाधिन तीन युवक आंबेडकर चौक येथे रविवारच्या रात्री दारूचा नशेत चकलस करित उभे होते. योगेश याने अचानक सागर च्या छातीवर चाकु ने सपासप वार करुन गंभीर जख्मी केले. युवकाचा […]

You May Like

Archives

Categories

Meta