कन्हान-गहुहिवरा रोड वर जिवघेणा गड्डा अपघातास निमत्रंण

कन्हान-गहुहिवरा रोड वर जिवघेणा गड्डा अपघातास निमत्रंण. 

कन्हान : –  गहुहिवरा-चाचेर रस्त्यावर नागपुर बॉयपास चारपदरी उडाण पुला सामोर दहाचाकी व त्यावरील जड वाहतुकीने रस्त्यावर मोठा जिवघेणा गड्डा होऊन  चालकांना एकाएक गड्डा दिसुन अडथळा निर्माण होत अपघाताला निमत्रंण देत असल्याने त्वरित दुरूस्ती करून वाहतुक सुरळीत करण्यात यावी. 

       कन्हान तारसा रोड वरील रेल्वे क्रॉसींग वर उडाण पुल निर्माण काम सुरू असल्याने या रस्त्यावरील जड वाहतुक बंद करून ती गहुहिवरा रस्त्याने वळविल्याने जड वाहतुकीची वर्दळ गहुहिवरा रस्त्याने वाढुन काही महिन्यापुर्वी डाबरीकरण करण्यात आलेल्या कन्हान- गहुहिवरा- चाचेर कडे जाणा-या गहुहिवरा रस्त्यावर नागपुर बॉयपास चारपदरी उडाण पुला अगोदर काही अंतरावर मोठा गड्डा झाला आहे. हा गड्डा एकाएक दिसुन वाहन चालकांची चांगलीच फजिती होऊन अप घाताला निमत्रंण देत आहे. रात्रीच्या वेळी अंधार अस ल्याने वाहनचालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन किंवा गड्डा वाचविण्याकरिता वाहन उजवी कडुन वाह न काढताना सामोरून येणा-या वाहनाची धडक होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. यास्तव संबधित रस्ता प्राधिकरण विभागाने रस्त्यावर पडलेल्या गड्डया ची चौकसी व शहानिशा करून त्वरित उपाय योजना करण्यात यावी. जेणे करून अपघाताला आळा घाल ता येऊन निर्दोष लोकांना वाचविता येईल.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

लॉज मध्ये महिलेस पैश्याचे प्रलोभन देऊन देहव्यापार करणा-या आरोपी पकडले. 

Fri May 7 , 2021
लॉज मध्ये महिलेस पैश्याचे प्रलोभन देऊन देहव्यापार करणा-या आरोपी पकडले.  #) कन्हान पोलीसांची लॉज वर धाड टाकुन कारवाई.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवाराती ल एन एच ४४ महामार्गा वरील स्पाट ऑन रेनबो लॉजिंग अँण्ड बोर्डींग मध्ये पिडीत महिलेस पैश्याचे आमिष देऊन देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणा-या आरोपीस पकडुन १३ हजार […]

You May Like

Archives

Categories

Meta