मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र पाठविण्याच्या अभियानास सुरुवात

*राज्याने धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी*
*अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी*
*मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र पाठविण्याच्या अभियानास सुरुवात*

सावनेर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, धनगर महासंघ आणि धनगर समाज विकास समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राम गणेश गडकरी महाविद्यालयात धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


अहिल्यादेवीच्या जयंतीचे औचित्य साधून धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेद्वारे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी करिता “एक पत्र समाजासाठी….एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्यांना”या अभियानाची सुरुवात देखील करण्यात आली.
महाराष्ट्रातील धनगर समाज मागील साठ वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून व संविधानिक अधिकारापासून वंचित आहे.२००२मध्ये ओरिसा, झारखंड, बिहार राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ अशी दुरूस्ती करण्यात आली. मात्र महाराष्ट्र शासनाने तशी शिफारस न केल्याने येथील धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे.यास्तव धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अनुसूचित जमातीच्या सवलतींचा लाभ देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे करावी.याकरिता धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अनिल ढोले यांनी आवाहन केल्याप्रमाणे सावनेर येथील समाज बांधव यांनी ‘एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्यांना’ या अभियानास सुरुवात केली.या पत्राद्वारे अनुसूचीत जाती आदेश (सुधारणा)अॅक्ट१९५६ मध्ये मध्य प्रदेशच्या एस.टी.चे यादीत हिंदी भाषिक उच्चारामुळे ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ चा समावेश झाला. समान यादी १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याने स्विकारली. अस्तित्वात नसलेल्या धनगड जमातीचा समावेश एसटी चे यादीत केल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज मागील साठ वर्षांपासून एसटी च्या सवलती आणि संविधानिक अधिकारापासून वंचित आहे. तरी ओरिसा, झारखंड, बिहार या राज्याप्रमाणे ‘ड’ ऐवजी ‘र’ अशी दुरूस्ती करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ देण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे करून धनगर समाजाला न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.बाबा टेकाडे प्रमुख अतिथी म्हणून पंजाब कसरे,तसेच धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विजय टेकाडे समन्वयक शरद नांदुरकर,तालुका अध्यक्ष प्रफुल्ल वडे,चंद्रकांत टेकाडे, दौलत डहाके, राजू भक्ते,ज्ञानेश्वर भक्ते,महादेव खरबडे,अनिल टेकाडे,गणेश डहाके, कोमल भक्ते,चंदू टेकाडे, शिवेन भक्ते तसेच इतर समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पाणी व प्राणवायु करिता आता तरी वृक्षारोपण आणि वृक्षा संवर्धन करूया 

Mon Jun 7 , 2021
पाणी व प्राणवायु करिता आता तरी वृक्षारोपण आणि वृक्षा संवर्धन करूया  #) मनुष्याला पाणी व प्राणवायु पुर्ण पणे नाही मिळाल्यास जिवन संपेल.   कन्हान : –  वृक्ष पासुन निसर्गाचा समतोल राखण्याचे अंत्यत महत्त्वाचे काम होते, पाऊस जमिनीवर पाडुन पाण्याची पातळी जोपासण्यास मदत होते तसेच मनु ष्याला जगण्याकरिता लागणारा प्राणवायु (ऑक्सिज न) वृक्षापासुनच […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta