प्रेम संबंधाच्या वादातुन युवकावर चाकुने हल्ला कन्हान शहरात गुन्हेगारीत वाढ पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न

प्रेम संबंधाच्या वादातुन युवकावर चाकुने हल्ला

कन्हान शहरात गुन्हेगारीत वाढ पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न

कन्हान,ता.०६ जून

   परिसरातील हरीहर नगर, कांद्री येथे प्रेम संबंधाच्या वादातुन आरोपी आकाश राऊत याने कुणाल वरखडे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर चाकुने मारून गंभीर जख्मी केल्याने पोलीसांनी कुणाल वरखडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी आकाश राऊत विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

     कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शहर आणि ग्रामिण‌‌ भागात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या ग्राफ वाढत आहे. शनिवार (दि.३) जुन ला दुपार सुमारास कामठी काॅलरी खदान नं.६ येथे अंगणवाडी जवळ बल्लन गोस्वामी, चिंटु राजपुत यांनी गोळीबार केला होता.‌ या घटनेला तीन दिवस होऊन सुद्धा कन्हान पोलीसांना आरोपीस अटक करण्यास यश आले नाही. यातच परिसरात दोन चाकु हल्याचा घटना घडल्याने पुन्हा एकदा शहरात कायदा, शांती सुव्यवस्थेवर आणि कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाले आहे.

    मिळालेल्या माहिती नुसार, कुणाल मनोहर वरखडे (वय १७) रा. हरिहर नगर, कांद्री यांचे मावशीच्या मुलीचे महिण्याभरा पासुन आकाश राऊत रा.आदर्श शाळेचा जवळ रायनगर, कन्हान यांच्या सोबत प्रेम संबंध होते. कुणाल वरखडे याचा बहिनीचा मोबाईल खाली पडल्याने अनेक दिवसापासुन बोलने चालने बंद आहे. रविवार (दि.४) जुन ला दुपारी २ वाजता आकाश राऊत कुणाल च्या घरी गेला. आणि म्हणाला की, “तुझी बहीन हिला बोलावुन घेवुन ये, मला तिचा सोबत बोलायचे आहे ” असे म्हटले असता कुणाल ने म्हटले की माझी बहीन घरी नाही आहे व तुझा माझ्या बहिनीशी काही संबंध नाही असे बोलल्या नंतर आकाश राऊत कुणाल च्या घरुन निघुन गेला. सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान आकाश राऊत पुन्हा कुणाल च्या घराजवळ आला. तेव्हा कुणाल आपल्या मावशीच्या घराकडे जात असताना आरोपी आकाश राऊत याने आपली दुचाकी वाहन थांबवुन कुणाल च्या उजव्या हाताच्या मनगटावर चाकुने मारुन गंभीर जख्मी करुन पळुन गेला. सदर प्रकरणी पोलीसांनी फिर्यादी कुणाल वरखडे यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी आकाश राऊत विरुद्ध अप क्र. ३४३/२३ कलम ३२४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दुचाकीला कारने धडक दिल्याने दोन गंभीर जख्मी 

Tue Jun 6 , 2023
दुचाकीला कारने धडक दिल्याने दोन गंभीर जख्मी कन्हान,ता.०६ जून  ‌नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ४४ वरील केरडी बसस्थानका जवळ कार चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन दुचाकी वाहना ला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वाहन चालक व त्याची आई गंभीर जख्मी झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहेत.      रविवार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta