कन्हान शहर विकास मंच ने केले आयोजन

*शिक्षक दिवसा निमित्य शिक्षकांचा केला सत्कार ,  लावले वृक्ष

* कन्हान शहर विकास मंच ने केले आयोजन


कन्हान ता.5 : कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वेगाने वाढत आहे हे लक्षात ठेवुन,मास्क लावुन, सोशल डिस्टेसिंग चे पालन करुन शिक्षक दिवस कन्हान शहर विकास मंच च्या वतीने थटात साजरा करण्यात आला.

5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती म्हणुन शिक्षक दिवस साजरा केला जातो.या शिक्षक दिवस निमीत्य  कन्हान शहर विकास मंच च्या वतीने सर्व प्रथम इंदिरा मागासवर्गिय मुलांचे वस्तीगृह शाळांकडून मध्ये  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी हार माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली. यावेळी सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी व सुप्रित बावने यांनी मार्गदर्शन केले.यानंतर आदर्श हायसकुल , बळीरामजी दखने हायस्कुल , नुतन सरस्वती हायस्कुल कांन्द्री येथे जाऊन सर्व शिक्षकांना वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व शाळेच्या प्रांगणा मध्ये वृक्ष लावुन शिक्षक दिवस शासन च्या नियमा चे पालन करुन शांततेत थटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रमाचे उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांनी केले तर आभार सोनु खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , सुप्रित बावने , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , सोनु खोब्रागडे , प्रवीण माने , नितिन मेश्राम , मनिष शंभरकर , योगेश मोहड , महेश शेंडे , सतिश ऊके , प्रकाश कुर्वे , अखिलेश मेश्राम , मुकेश गंगराज , अक्षय फूले , शुभम मंदुरकर आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शिवशक्ती आखाडा बोरी येथे शिक्षक दिवस साजरा

Sun Sep 6 , 2020
शिवशक्ती आखाडा बोरी येथे शिक्षक दिवस साजरा कन्हान ता.6  : शिवशक्ती आखाडा बोरी ( सिंगोरी) येथे शिक्षक दिवस दि.5 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.यात एकुण 80 विद्यार्थी यांनी सहभाग घेत दहा विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थना शिकवलं.याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा प्रतिमेला पूजन करून एका विद्यार्थी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची भुमिका साकारली. […]

You May Like

Archives

Categories

Meta