शिवशक्ती आखाडा बोरी येथे शिक्षक दिवस साजरा
कन्हान ता.6 : शिवशक्ती आखाडा बोरी ( सिंगोरी) येथे शिक्षक दिवस दि.5 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.यात एकुण 80 विद्यार्थी यांनी सहभाग घेत दहा विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थना शिकवलं.याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा प्रतिमेला पूजन करून एका विद्यार्थी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची भुमिका साकारली.
यावेळी शिवशक्ती आखाडा प्रमुख पायल येरणे व निकिता येरणे उपस्थित होते तसेच निखिल येरणे, शुभम येरणे , प्रफुल येरणे व ज़िल्हा परिषद शाळा बोरी येथील शांताराम जळते सर उपस्थित होते. ज्या विद्यार्थी शिक्षक बनले होते त्यांना आखाडा कडून पेन व पुष्प गुच्छ भेट वस्तू देऊन सन्मानित केले.
यात शिक्षक म्हणून सहभागी विद्यार्थी आचल येरणे ,प्रणाली येरणे ,संचालि येवले, अंजली येवले,तृप्ती येवले,
रुचिका भोले ,पायल येरणे ,निकिता राठोड ,किंजल नागपुरे ,सुहानी काकीरवर ,आरुष येरणे यांनी शिक्षक म्हणून भाग घेतला तर शिक्षक दिवसाच्या निमीत्य जि.प.शाळेतील आणि खाजगी आजी माजी विद्यार्थी आरुष येरणे ,आचाल येरणे ,उनत्ती येरणे ,अंजली येवले निकिता राठोड,वांशिक नेरकर,पायल येरणे ,रुचिका भोलेआर्या येरणे ,हर्षल राऊत ,रितिक येरणे ,किंजल नागपुरे,सुहानी काकीरवर,तृप्ती येवले आदी सहभागी झाले होते.