अवैध चोरीचा आठ टन कोळसा वेकोली सुरक्षा अधिका-यांनी पकडला

अवैध चोरीचा आठ टन कोळसा वेकोली सुरक्षा अधिका-यांनी पकडला. 


कन्हान : –  वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानचा कोळसा डुमरी रेल्वे कोळसा यार्ड व इतर ठिकाणी ट्रक व्दारे वाहतुक करण्यात येत असुन गोंडेगाव डुमरी रस्त्यावर अवैध कोळसा चोरी करणारे ट्रक चालकाला पैसे देत रस्त्या लगत कोळसा पाडतात असा अवैध कोळसा वेकोलि सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी पेट्रोलिंग दरम्यान १३ टन कोळसा पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार देत जप्त केला.   

          वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खाणीतील कोळसा औष्णीक विधृत केंद्राकरिता दहा, सोळा चाकी ट्रक व्दारे डुमरी रेल्वे कोळसा यार्ड मध्ये व इतर ठिकाणी वाहतुक होत असताना गोंडेगाव खु ली कोळसा खदान ते डुमरी मार्गावरील रस्त्यावर अवै ध कोळसा चोरी करणारे ट्रक चालकांस पैसे देऊन ट्रक मधुन कोळसा पाडुन चांगल्या किमतीत दुसरी कडे ट्रकने नेऊन विकतात. शुक्रवार (दि.४) ला सकाळी ९ वाजता दरम्यान गोंडेगाव डुमरी रस्त्या लगत अवैध चोरीचा १३ टन कोळसा पडला दिसल्याने वेकोलि गोंडेगाव सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश पाल, सुरक्षा रक्षक आशिष लांबट, संदीप यादव, अजय उईके, विक्की यादव हयानी पकडुन कन्हान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून १३ टन ६०० किलो कोळ सा जप्त करित कोळसा खदान च्या यार्ड मध्ये जमा करण्यात आला असुन अञात आरोपीचा शोध घेत कन्हान पोलीस स्टेशनचे राहुल रंगारी पुढील तपास करित आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गटनेते सह १ ९ सदस्य अपात्र ठरविण्याचे आदेश : काटोल

Sun Dec 6 , 2020
काटोल  : नगर परिषद नगराध्यक्ष , उपाध्यक्ष , गटनेते सह १ ९ सदस्य अपात्र ठरविण्याचे आदेश महाराष्ट्र नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज ( शुक्रवारी ) काढल्याने खळबळ उडाली . काटोल येथील अर्जदार राधेश्याम बासेवार , राजेश राठी , नगरसेवक संदीप वंजारी यांनी वेगवेगळ्या व काही संयुक्त अशा चार […]

You May Like

Archives

Categories

Meta