एंसबा शिवार पेंच नदीतुन अवैध रेती चोरी करतांना तीन आरोपीना रंगेहाथ पकडले इतर पसार

एंसबा शिवार पेंच नदीतुन अवैध रेती चोरी करतांना तीन आरोपीना रंगेहाथ पकडले इतर पसार.

#) पोकलेंड,जेसीबी,दोन ट्रक,दोन वाहन ,२६२ ब्रॉस रेतीसह ९०,७२,००० रू.चा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एंसबा शिवारातील पेंच नदी पात्रातुन अवैधरित्या चोरीची रेती वाहतुक करताना पोकलेंड,जेसीबी,दोन ट्रक, टोयाटो वाहन, मारोती सुझकी वाहन ,२६२ ब्रॉस रेती, दोन प्लास्टिक ड्रम, १२० लिटर डिझेल अशा अंदाजे ९० लाख ७२ हजार रूपयाचा मुद्देमालासह तीन आरोपी पकडले तर इतर आरोपी पोलीसांना पाहुन पसार झाले.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पेंच व कन्हान नदी पात्रातुन बिनधास्त पणे अवैधरित्या रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने असामाजिक तत्व डोके वर काढत आहे. कन्हान पोलीस पेट्रोलिंग करित असताना काही इसम पोकलेंड, जेसीबी व ट्रक व्दारे अवैध रेती वाहतुक करित असल्याचे गुप्त माहीती वरून पोलीस स्टाप पंचासह एंसबा शिवारातील पेंच नदी पात्रात गेले असता आरोपी १) रत्नाकर नथु जी चक्रपाणी वय ४९ वर्ष रा वार्ड न २ मिलींद चौक खापरखेडा, २) मो.शोयब शबीर अंसारी वय १८ वर्ष रा संजय नगर बंगाली कॉलोनी कमसरी बाजार कामठी, ३) रमीज खान हमीद खान वय २६ वर्ष रा कादर झेंडा कामठी, ४) रिजवान शेख वय २५ वर्ष रा कामठी ५) विना क्रमाकचा पोकलेंड चा चालक, ६) ट्रक क्र एमएच ४०एन०१६८ चा चालक, ७) ट्रक क्र एमएच ३१एम ६३६६चा चालक रविवार (दि.७) ला २.१० ते ३.१५ वाजता दरम्यान पोकलेंड, जेसीबी, ट्रकच्या मदतीने एंसबा शिवारातील पेंच नदी पात्रातुन अवैधरित्या चोरून रेतीची वाहतुक करताना पोलीसांनी शिताफितीने आरोपी १ ते ३ ला पकडले तर इतर पसार झाले. या कार्यवाहीत कन्हान पोलीसानी विना क्रमाक चा पोकलेंड अंदाजे किमत ३० लाख, जेसीबी क्र एमएच ४०बीई ८०२७ किमत २० लाख, ट्रक क्र एमएच ४०एन ०१६८ किमत १० लाख, ट्रक मधिल २ ब्रास रेती किमत ६ हजार, ट्रक क्र एमएच ३१ एम ६३६६ किमत १० लाख, ट्रक मधिल २ ब्रास रेती किमत ६ हजार, टोयाटो कॉलीस वाहन क्र एमएच ४९ए ३५२ किमत ५ लाख, मारोती सुझकी ब्रेझा वाहन क्र एमएच ४० ए ३७४९ किमत ८ लाख, नदी शेजारी शेतात २५० ब्रास रेती किमत ७ लाख ५० हजार, प्लास्टीक ड्रम मध्ये १२० लिटर डिझेल किमत ९६०० , एक प्लास्टीक ड्रम किमत ४०० रुपये अशा अंदाजे एकुण ९०,७२,००० (नव्वद लाख बाहत्तर हजार रूपये ) च्या मुद्देमालासह आरोपी १ ते ३ ला पकडले तर इतर पोलीसांना पाहुन पळाले.

कन्हान पोलीसांनी जेसीबी, एक ट्रक, टोयाटो, मारूती सुझकी वाहन, एक ड्रम व १२० लिटर डिझेल सह तीन आरोपीना पोलीस स्टेशन ला आणले तर उर्वरित योग्य साधन नसल्याने घटनास्थळी सुरक्षित ठेवुन सात ही आरोपी वर कलम ३७९, १०९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. ही कार्यवाई नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार अरूण त्रिपाठी, सपोनि सतिश मेश्राम, पोउपनि सुरजुसे, पोउपनि जावेद शेख, नापोशि कुणाल पारधी, राजेंद्र गौतम, पोशि सुधिर चव्हाण, शरद गिते, सम्राट वनमती, जितेंद्र गावंडे आदीने यशस्विरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये पलटवण्यात असामाजिक तत्व सक्रिय

Sun Feb 7 , 2021
*गॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये पलटवण्यात असामाजिक तत्व सक्रिय * पेट्रोल,डीजल सोबत एल.पी.जी.गॅस दर वाढल्याने सिलेंडर तीन चाकी वाहनात पलटवण्यावर जोम * एल.पी.जी.गॅस सिलेंडरचा काळाबाजार कन्हान ता. 7 फेबुवारी      देशात ,राज्यात तसेच शहरात देखील पेट्रोल व डीझेलचे भाव दिवसे दिवस वाढत चाललेले आहे. यामुळे सर्वसामान्य […]

You May Like

Archives

Categories

Meta