डुमरी शिवारात भीषण अपघात एकाचा मृत्यु : अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

डुमरी शिवारात भीषण अपघात एकाचा मृत्यु

#)  कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. 

कन्हान : – पोलीसस्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात एका अनोळखी वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगा ने व निष्काळजी पणाने चालवुन रहेमत अली शेख यांना धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळा वरच मृत्यु झाला .

         प्राप्त माहिती नुसार गुरुवार दिनांक ४ मार्च ला रात्री ८ वाजता च्या सुमारास डुमरी शिवारात फिर्यादी रुकसाना अकबर खान हे आपल्या घरी हजर असतां ना फिर्यादीचे घर शेजारी राहनारे रामसिंग यांनी फोन द्वारे सांगितले कि तुमच्या वडीलांचा डुमरी शिवारात अपघात झाला आहे व त्यांना प्रथम उचारासाठी उप जिल्हा रुग्णालय कामठी येथे नेले आहे. अशा माहिती वरुन रुकसाना अकबर खान हे आपल्या परिवारासह कामठी उपजिल्हा रुग्णालयात गेले व चौकशी केली असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन फिर्यादीचे वडील रहेमत अली शेख यांना मृत्यु घोषित केले. सांगितले जात आहे कि फिर्यादी रुकसाना अकबर खान यांचे वडील रहेमत अली शेख यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाच्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवन रहेमत अली शेख यांना धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळा वरच मृत्यु झाला . 

कन्हान पोलीसांनी फिर्यादी रुकसाना अकबर खान यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम २७९ , ३०४ – ए  व १८४ नुसार गुन्हा दाखल करुन कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात आरोपी वाहन चालकाचा शोध कन्हान पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केलवद पोलिस स्टेशन येथे जागतिक महिला दिन साजरा

Tue Mar 9 , 2021
केळवद : जागतिक महिला दिन निमित्ताने पोलीस स्टेशन केळवद येथे मा . नायब तहसिलदार श्रीमती दराडे मैडम तहसित कार्यालय सावनेर यांना आंमत्रित करन पोलीस स्टेशन केळवद येथील ग्राऊंडवर जागतिक महिला दिन निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला असुन पो.स्टे . परिसरातीत महिला पोलीस पाटिल , महिला सरपंच , महिला दक्षता समिती सदस्य […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta