पुरग्रस्ताना शासनाने त्वरित मदत करावी : नगराध्यक्षा आष्टनकर

पुरग्रस्ताना शासनाने त्वरित मदत करावी. – नगराध्यक्षा आष्टनकर


कन्हान : – पेंच व तोतलाडोह धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने कन्हान नदीला महा पुर येऊन नदीकाठाजवळील लोकांची घरे पाण्यात बुडुन नागरिकांच्या उदरनि र्वाहाच्या साहित्य व निवा-याचे मोठया प्र माणात नुकसान झाल्याने सरकारने तात डीने पुरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करावी असे नगराध्यक्षा करूणाताई आ ष्टनकर हयांनी शासनाकडे मागणी केली.           कन्हान नगरपरिषदेचे व्यवस्थित पदभार साभाळत नाही तर कोरोना संस र्ग रोगाच्या महामारी संकटामुळे संपुर्ण देशात व राज्यात टाळेबंदी व संचारबंदी लागली. १६ एप्रिला लोहिया लेआऊट चा पहिला कोरोना रूग्ण आढळुन चार महिने लढत असतानाच मध्य प्रदेशातील अतिवृष्टीने चौराई व तोतलाडोह धरणे भरून पेंच धरणाचा जलसाठा वाढुन १६ दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग केला. याची प्रशासनाने कुठलीच पुर्व सुचना न दिल्याने पेंच व कन्हान नदीला शुक्रवार (दि.२८) च्या मध्यरात्री पासुन महापुर येऊन नदीकाठा जवळील नागरिकांची घरे पाण्यात बुडत असताना स्थानिय जनप्रतिनिधी व नागरिकांनी पुरग्रस्ताना मदतीचा हात देत सुरक्षित स्थळी पोहच वित नगरपरिषदे मार्फत त्याच्या राहण्या ची व जेवणाची तात्पुरती व्यवस्था केली. परंतु या महापुराने त्याच्या दैनदिनी उदर्ह निर्वाच्या साहित्य, वस्तु व निवा-याचे मो ठया प्रमाणात नुकसान होऊन हातमजु री करण्यां-चा संसार उघडयावर आला. पहिला कोरोना सकंटाचा मार आणि त्यावर महापुराचा दणका यामुळे सर्वसा मान्य पुरग्रस्त कुंटुबाना संसाराची घडी नव्याने बसवित पोट भरण्याच्या यातने च्या उबंरठयावर असल्याने पिपरी, धरम नगर, सिहोरा, सत्रापुर पुरग्रस्त नागरिकां ना सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी. तसेच दिवसेदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत असुन येथील नागरि कांच्या दैनदिनी मुलभुत गरजेच्या सम स्या सोडवुन कोरोना संकटापासुन नाग रिकांना सुरक्षित करण्याकरिता उपाय योजना योग्य राबविण्यास कन्हान नगर परिषदेला स्थायी कर्तव्यदक्ष मुख्याधिका री यांची नियुक्ती शासनाने त्वरित करावी .असे नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर हयांनी पत्रपरिषदेत शासनाशी मागणी केली. याप्रसंगी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेविका गुंफा तिडके, रेखा टोहणे प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिक्षकांना कोविड कार्यातून मुक्त करा : शिक्षक संघाची मागणी

Mon Sep 7 , 2020
*शिक्षकांना कोविड कार्यातून मुक्त करा * विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) मागणी * जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर कन्हान ता.7 कोविड – १९ सेवेत कार्यरत शिक्षकांना आॅनलाईन शिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून […]

You May Like

Archives

Categories

Meta