शिक्षकांना कोविड कार्यातून मुक्त करा : शिक्षक संघाची मागणी

*शिक्षकांना कोविड कार्यातून मुक्त करा

* विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) मागणी * जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

कन्हान ता.7 कोविड – १९ सेवेत कार्यरत शिक्षकांना आॅनलाईन शिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या प्रश्नावर शिक्षण वर्तुळात चर्चा रंगली आहे.
निवेदनात नमूद केल्या प्रमाणे कोविड – १९ या आजारासंबधात आवश्यक सेवेसाठी अनेक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या पातळीवर स्थानिक प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती संदर्भात अधिग्रहितही केले होते. शाळा प्रत्यक्षपणे सुरू झाल्या नसल्या तरी २४ जून व १७ आॅगस्ट २०२० च्यासंदर्भाधीन परिपत्रकान्वये काही शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच त्या शिक्षकांना शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत उपयोग करून घ्याव्यात, असे निर्देशही दिले आहे. परिणामी त्या प्रक्रियेत शिक्षक व्यस्त आहेत. परिपत्रकातील निर्देशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री चिंतामण वंजारी यांनी ३१ आॅगस्ट रोजी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कोविड १९ च्या कामासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची स्पष्ट निर्देश दिले आहे.

या निर्णयानुसार नागपूर जिल्ह्यातील कोविड – १९ च्या कामातून संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) तर्फे जिल्हाधिकारींना दिलेल्या निवेदनातून शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, ग्रामीण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, महिला जिल्हा संघटक सौ प्रणाली रंगारी, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, दुर्गा लुटे, अरविंद घोडमारे, सिमा बदकी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शैक्षणिक वर्षात बदल करण्यात यावा : राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे साकडे  

Tue Sep 8 , 2020
शैक्षणिक वर्षात बदल करण्यात यावा #) पंतप्रधानांना डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे साकडे कन्हान : –  कोविड -१९ हया जागतिक महामारीमुळे अवघे विश्व संकटात आहे. या महामारीमुळे मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल दिसून येत आहेत. दरवर्षी माहे जुन मध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. ती या वर्षी देखील झाली […]

Archives

Categories

Meta