माझे कुटुंब माझी जबाबदारी कन्हान प्रा आ.केन्द्रच्चा बैठाकीत तालुका वेद्याकिय आधिकारी हस्ते शुभारंभ

*माझे कुटुंब माझी जबाबदारी कन्हान प्रा आ.केन्द्रच्चा बैठाकीत तालुका वेद्याकिय आधिकारी हस्ते शुभारंभ*

कमलासिह यादव
पाराशीवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी(ता प्र):-पाराशिवनी तालुक्यात कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला तालुकातून हद्दपार करण्यासाठी १८सेत्टेबंर रोजी प्राथमिक आरोग्य केन्द येथे माझे कुटूंब, माझी जबाबदारी, माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केन्दाचे सभागृहात झालेली आशावर्कर,अंगनवाडी सेविक ची व कर्मचारीची बैठक घेण्यात आली.

तालुका वैद्यकिय आधिकारी डॉं प्रशांत वाघ ,डॉः योगेश चोधरी, धोटराज जी,श्री पवार जी आशा प्रर्वतक किरण लेड़े,आशा प्रर्वतक शिगणें मैडम, यांनी मर्गदर्शान केले , व साहित्य वाटण्यात आले , २९सेप्टेबर .पा सुन ५अक्टुबर पर्यत एकुण ४९टिम मध्ये १५०कर्मचारी कन्हान क्षेत्रात घरोघरी जात आहे सोमवार पर्यत ८६३८घरी जाऊन , , कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी कन्हानतील कुटुंबांच्या गृहभेटी घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच या विषाणूंमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी तसेच आपण कुठली काळजी घ्यावी याविषयीची माहिती दिली. त्यामुळे या माध्यमातून ४०हजार नागरिकांपयर्ंत माहिती पोहोचण्यास मदत झाली आहे.
राज्य शासनाने कोरोना आजाराविषयी शिक्षण देणारी ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम राज्यात सुरू केली. याच मोहिमेचा एक भाग म्हणून प्रशासनाने लोकांच्या सहभागातून या मोहिमेत एक पाऊल पुढे टाकून आणि त्यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे ‘माझे कुटुंब-माझे जबाबदारी, माझी जनजागृती’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. कन्हान प्रा आ केन्दातुन१५०अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांचा या मोहिमेत यामध्ये सहभाग घेतला. क्षेत्रातिलसर्ब कुटुंबाला गृहभेटीचे नियोजन असतांना सोमवार (५आक्टोबर)पर्यत प्रत्यक्ष ८६३८ हजार कुटुंबाला गृहभेटी देण्यात आल्या. यामधून ४० हजार ७४२ नागरिकांपयर्ंत या मोहिमेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती करण्यास मदत झाली. नागरिकांमध्ये जनजागृती करप्यात आली अधिकारी, कर्मचारी या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी कुटुंबांना भेट घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत माहिती दिली. कुटुंबातील व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी प्रत्येकाने शरीराचे तापमान व ऑक्सीजन पातळी मोजावी. सातत्याने तोंडाला मास्क घालून राहावे. दर दोन-तीन तासांनी सतत हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे. तसे करणे शक्य नसल्यास सॅनीटायझरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी. ६०वर्ष च्या क्ट ६८७ वृध्दा ची तपासणी करून ,व मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजावी. सध्या सुरू असलेले आजारपणातील उपचार सुरू ठेवावेत. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी. कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींनी गृहविलगीकरणात राहावे. कोविड-१९ मधून बरे झालेल्या व्यक्तीस प्लाज्मा दान करावयाचा असल्यास एसबीटीसी या संकेतस्थळाची माहिती आदी माहिती गृहभेटी देणार्‍या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी गृह भेटीदरम्यान कुटुंबांना दिली. मोहिम यशस्वी करण्यासाठी , , तालुकास्तरावर,व पाच ही प्राथमिक आरोग्य केन्द स्तारवर बैठका घेण्यात आल्या .

यासाठी पारशिवनी तालुकातिल नागरिक, सेवाभावी संस्था, पदाधिकारी समाजातील विविध घटकांचे सहकार्य मिळाले. गृहभेट देऊन जनजागृती केलेल्या कुटुंबाबाबतचा अहवाल विहित प्रपत्रात संकलीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कोळसा कामगाराच्या वार्षिक बोनस कडे लक्ष ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Wed Oct 7 , 2020
कोळसा कामगाराच्या वार्षिक बोनस कडे लक्ष.  कन्हान  : –  दरवर्षी दुर्गा पूजेच्या अगोदर कोळसा कामगारांना बोनस देण्यात येते. देशात टाळेबंदी लागल्यानंतर वेतनासाठी ताटकळत राहिलेल्या कामगारांना देशातील टाळेबंदी शिथिल होताच बाजार व कोळसा कामगारांचे लक्ष बोनस वर केंद्रित झाले आहे. कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यात देशात टाळेबंदी लागल्या नंतर इतर उद्योग व कार्यालयातील […]

Archives

Categories

Meta