दोन महिन्या पासून कोविड च्या सर्वेला शिक्षिका गैरहजर ; रोजंदारी असलेला इसम करतो सर्व्हे : सावनेर

*दोन महिन्या पासून कोविड च्या सर्वेला शिक्षिका गैरहजर..*
*रोजंदारी असलेला इसम करतो सर्व्हे.*
*सावनेर येथील संत.सीताराम महाराज परिसर येथील घटना..*

सावनेर:- महाराष्ट्र सरकार ने काढलेल्या कोरोना संबंधित असलेल्या योजना राबविण्यात आली असून प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोना बाबतीत सर्व्हेक्षण करून नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम सावनेर नगर परिषद ने शहरात 2 महिन्या पासून राबविण्यात आली..या कोविड तपासणी सर्वेक्षणात अशा वर्कर,शिक्षिका व नगर परिषद चे कर्मचारी कार्यात सहभागी होते..सावनेर येथील संत सीताराम महाराज मठा जवळ असलेल्या प्रभाग क्र.१० च्या भागात गेल्या 1 महिन्या पासून कोविड तपासणी सर्व्हे करण्यात आला नाही या प्रभागात सर्व्हेक्षण कार्य करणाऱ्या शिक्षिका नगर पालिकेने सोपवलेले होते…
स्थानिक नागरिकांच्या कोविड सर्व्हेक्षण नोंदणी कार्डा वर गेल्या जुलै महिन्या पासून कुठलीही नोंदणी व तपासणी करण्यात आलेली नाही नागरिकांच्या कार्डा मध्ये प्रभाग क्र १० तील नोंदणी करणाऱ्या जवाहर नेहरू हायस्कूल सावनेर येथील शिक्षिका पांडव मॅडम असे नाव दिसून आले…
मिळालेल्या माहितीनुसार या बाबतीत सावनेर नगर परिषद चे मुख्यधिकारी रवींद्र भेलावे यांनी या संबंधित माहीती देण्यात आली सर्व्हेक्षण करणाऱ्या शिक्षिका यांचा घरी त्यांचा अपघात झाल्याने त्याना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले त्यामुळे ते त्या प्रभागात सर्व्हे करिता गैरहजर आहे त्या परिसरात नगर परिषद ने खाजगी इसम रोजी ने सर्व्हे करत असल्याचे सांगितले नगर परिषद चे मुख्याधिकारी यांनी सांगितलेल्या माहिती नुसार शहरात बऱ्याच वस्ती मध्ये राहत असलेले नागरिक हे सकाळीच शेतात कामावर जाण्या करिता घरा बाहेर पडतात अश्या परिवारा करिता नगर परिषद तर्फे या कुटुंबातील सदस्या ची तपासणी संध्याकाळी ६ वाजता नंतर २ तास परीवाराची कोविड टेस्ट ची तपासणी करण्यात येईल.
नगर पालिकेच्या या निष्काळजी पणा मुळे नागरिकां च्या तक्रार समोर येत आहे की त्यांच्या परिसरात सर्व्हे करिता कोणी ही येत नसल्याचे सांगण्यात आले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबलू चौधरी

Wed Oct 7 , 2020
दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबलू चौधरी सावनेर : महाराष्ट्र राज्य दिव्यांग ( अपंग ) संघटना भूम , जि . उस्मानाबादच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नागपुर जिल्हातील सावनेर तहसिल मधिल वाकोडी येथील बबलू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . बबलू चौधरी आतापर्यंत कोणत्याही संघटनेशी जुडले नव्हते . ते मागील अनेक वर्षापासून गोरगरीब दिव्यांग […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta