बस व मोटार साईकल च्या धडकेत दोघांचा मृत्यु ,एक गंभिर,ड्रायव्हर अटक

*बस व मोटार साईकल च्या धडकेत दोघांचा मृत्यु एक गंभिर,ड्रायव्हर अटक*

#) बागळकर ले – आऊट पारशिवनी येथील घटना .

कन्हान – पारशिवनी पोलीस स्टेशन च्या हदीत येणाऱ्या बागळकर ले – आउट जवळ बस व मोटार साईकल च्या धडकेत दोघांचा मृत्यु व एक गाभिर जख्मी झाल्याची घटना समोर आल्याने पारशिवनी पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन जखमी झालेल्या युवकांना सरकारी दवाखान्यात रेफर केले असता दोघांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला . पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी रवी रमेश मेश्राम वय ३२ वर्ष राहणार प्रभाग क्रमांक ३ केदारेश्वर नगर बागळकर ले – आऊट पारशिवनी यांचा तक्रारी वरुन बस चालकास अटक करुन व गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त माहिती प्रमाणे अशी कि बुधवार दिनांक ०६ जानेवारी २०२१ ला रात्री ११ वाजता च्या दरम्यान मोरबी चौक पारशिवनी येथे चहा पित असतांना खापरखेड़ा मार्ग ने यश ज्ञानदेव भालेराव वय अंदाजे १७ वर्ष हा त्याचे मोटार सायकल वर त्याचे दोन मित्रासह खापरखेडा रोड वरूनपारशिवनी गावाकडे येत असतांना, आमडी फाटा ते सावनेर रोड नेतुमसर वरून मुलताई ला जाणारी ट्रवहल्स बस भरघाव वेघाने जाणार्या निळ्या व पांढर्या रंगाच्या बस ने मोटार सायकल चालकास जोराची धडक दिल्याने मोटार सायकल वरील मुले रोडावर मोटार सायकल सह पडुन थोरात आपटल्याचा आवाज आल्याने मी व माझा मित्र मोनु जैन मोक्यावर धावत जाऊन त्या तिघही मुलाला बघितले तर १) यश ज्ञानदेव भालेराव वय अंदाजे १७ वर्ष , २) अनुप अतुल पनवेलकर वय अंदाजे १६ वर्ष व ३) लक्की अशोक चव्हान वय अंदाजे १८ वर्ष सर्व राहणार पारशिवनी यांना डोक्याला , हाताला , व पायाला खुप मोठ्या प्रमाणात मार लागल्याने रक्त वाहन होते व त्यांची मोटार सायकल क्रमांक MH-40 / BH / 4137 ही अपघाता मध्ये पुर्ण तुटफुट झाली असुन बस चालकाने अपघात झालेल्या युवकांना कुठल्याही प्रकारची मदत न करता मोक्यावरुन सावनेर रोडानी भरघाव वेगाने पळुन गेले असता गावतल्या नागरिकांनी त्याचा पाठलाग केले असता बस नंबर MP 48 / P- 0291 असे सांगितले जात आहे व बस खापा पोलिस स्टेशन ला जत्त केली . मोक्यावरील तिन्ही जखमींना उपचारा करिता सरकारी दवाखाना पारशिवनी येथे पोलींसांचा मदतीने घेऊन गेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी जखमींचा प्रथम उपचार करुन पुढील उपचार करीता नागपुर येथे रेफर केले असता उपचारा दरम्यान १) यश ज्ञानदेव भालेराव वय अंदाजे १७ वर्ष , व २) अनुप अतुल पनवेलकर वय अंदाजे १६ वर्ष अनुप हा नववी वर्गो चा विद्यार्थी होता या दोघांचा मृत्यु झाला . तर ३) लक्की अशोक चव्हान वय अंदाजे १८ वर्ष याचा उपचार कोणत्या दवाखान्यात सुरु आहे हे अजुनही कळले नाही .
पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी रवी रमेश मेश्राम वय ३२ वर्ष राहणार प्रभाग क्रमांक ३ केदारेश्वर नगर बागळकर ले – आऊट पारशिवनी यांचा तक्रारी वरुन बस चालक प्रकाश डिमर डाहारे वय ५५ वर्ष राहणार चलदौरा ता मुलताई जिल्हा बैतुल यांचा अपराध क्रमांक १०/२०२१ कलम २७९ , ३३८ , ३०४(अ) भादवि सहकलम १८४,१३४ मोवाका गुन्हा दाखल करुन पारशिवनी पोलीस निरीक्षक वैरागडे यांचा मार्गदर्शनात पुढील तपास पारशिवनी पोलीस उपनिरिक्षक ज्ञानबा पळनाटे सह पो।लेस कर्मी मुद्दस्सर जमाल,संदिप कडु,मेघरें ,अमित यादव ,गायकवाङ सह अन्य सिपाई करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्य पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रम थटात साजरा

Fri Jan 8 , 2021
*कन्हान येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्य पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रम थटात साजरा* #) कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन . कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती निमित्य पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेस […]

You May Like

Archives

Categories

Meta