सावनेर येथे लसीकरण केंद्रावर विरोध झाल्यामुळे गोंधळ

आधार कार्ड नुसार स्थानिक लोकांना द्यावी प्राथमिकता : माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे

सावनेर : १८ ते ४५ वयोगटातील लसिकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या सर्व नागपूरच्या नागरीकांचे सावनेरमध्ये लसिकरण करण्यात येत असल्याने नागपूर जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वात सावनेर च्या लसिकरण केंद्रावर स्थानीकांचेच लसिकरण करण्यावर जोर देत गोंधळ घालण्यात आला . यामुळे सावनेरच्या भालेराव हायस्कुल येथे लसिकरणासाठी निर्माण झालेल्या गोंधळात राजकिय कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने काही तास लसीकरण थांबवावे लागले . राज्य सरकार द्वारे कोविड शिल्ड व कोवॅक्सीन अश्या दोन प्रकारच्या लसी कोरोनापासून बचावा करीता नागरीकांना लावण्यात येत आहे . कोविशिल्ड ही वॅक्सीन ( लस ) अमेरीकेच्या ऑक्सफोर्ड अॅक्राझेनका व भारताच्या सिरम इंस्टीटयुट ने मिळून भारतात बनविलेली आहे . तर को – वॅक्सीन ही भारतातील निर्मीती आहे . त्यामुळे को – वॅक्सीन ही आधी आली व कोविशिल्ड ही नंतर , दोन्ही कंपन्या दोन्ही वॅक्सीन चांगल्या असल्याचा दावा करीत आहे . परंतू भारतातील कोवॅक्सीन ही म्युटेंड वायरसलाही डिटेंड ( शोधत ) करीत असल्याचे तज्ञांचे मत आहे .

सावनेर शहरातील विविध केंद्रात कोविशिल्ड ही लस लावण्यात येत असून शासनाने १८ वर्षा वरिल तरूणांना कोवॅक्सीन लसिकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा मार्ग काढला आहे . परंतू या ऑनलाईन नोंदणी मध्ये नागपूर जिल्हयात ४ केंद्र ठरविले असून यात सावनेर , काटोल , कन्हान , कामठी , अशी शहरे आहेत . त्यामुळे ज्यांना जे ठिकाण सोईचे आहे ते त्या ठिकाणाला पसंती दाखवून वॅक्सीनच्या पसंतीनुसार नोंदणी करीत आहे . यात सावनेरच्या युवकांची ऑनलाईन नोंदणी न झाल्याने व नागपूरच्या युवकांना ३०० ते ३०० लसीचे रजिस्ट्रेशन सावनेर केंद्र मिळाल्याने येथील नागरीकांनी लसिकरणासाठी कुठे जावे ? असा प्रश्न उपस्तिथ करीत नागपूर जि.प. चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सावनेर येथील भालेराव हायस्कुल च्या लसिकरण केंद्रावर गोंधळ घालीत सुरू असलेले लसिकरण थांबविण्यात आले . यावेळी सावनेरचे उपविभागिय अधिकारी अतुल मेहेत्रे यांनी केंद्रावर धाव घेवून यासंमधी जिल्हाधिकाऱ्यांस माहिती देत अधिक वॅक्सीनचे केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले . यामुळे थांबलेले लसिकरण पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आले .

डाॅ. रूशाली जयस्वाल
लसीकरण केंद्र निरिक्षक
*सावनेर शहरातील तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांनी सावनेर येथील भालेराव हायस्कूल सावनेर येथे को व्हॅक्सिन केंद्र सुरु झाले आहेत याकरिता खालील दिलेल्या लिंक वर जाऊन जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करून लस घ्यावी ही विनंती
सावनेर केंद्रासाठी दररोज सायंकाळी 7 ते 7.30 वाजता खालील वेबसाईड वर रजिस्टेशन सुरु राहिल.
https://www.cowin.gov.in/home

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पुसद मतदार संघांचे आमदार इंद्रणिल नाईक यांची घाटंजी कोविड सेंटर ला भेट

Sun May 9 , 2021
*पुसद मतदार संघांचे आमदार इंद्रणिल नाईक यांची घाटंजी कोविड सेंटर ला भेट* घाटंजी : तालुक्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राष्ट्रवादी विद्यार्थी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तथा उपसरपंच रितेश बोबडे बऱ्याच दिवसांपासून तालुका कोविड सेंटरला ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध व्हावी या करिता कित्येक दिवसापासून तालुका आरोग्य विभाग, यवतमाळ जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष […]

You May Like

Archives

Categories

Meta