कन्हान परिसरात १०७६ नागरिकांचे लसीकरण
#) प्राथमिक आरोग्य केंद्राला व्यवस्थित लसीचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३०८, कांद्री २४७ व घाटरोहणा ३३५ असे ८९० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे १८६ असे कन्हान परिसरात एकुण १०७६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य केंद्राला लस पुरवठा कमी होत असल्याने कित्येक नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत ़असल्याने प्रशासनाने व्यवस्थित लसीचा पुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे.
कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील वया च्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम सुरू सुरूवात करण्यात आली असुन बुधवार (दि.७) जुलै २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३०८, कांद्री २४७ व घाटरोहणा ३३५ असे ८९० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे १८६ नागरिकाना लसीकरण करण्यात आले असुन कन्हान परिसरातील एकुण १०७६ नागरि कांना लसीकरण करण्यात आले. १८ वर्षा पासुन लसीकरण सुरूवात झाल्याने युवक युवती लस घेण्यास उत्सुकतेने येत असुन लस पुरवठा कमकुवत होत असल्याने केंद्रावर रांगा लागुन गर्दी होत आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रास पाहीजे त्या प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने नागरिकांना तासनी तास रांगेत उभे राहुन निराश होऊन परत जावे लागत असल्याने शासनाने लस पुरवठा वाढविण्याची युवा वर्ग व नागरिकां कडुन मागणी होत आहे.