तरुणाचा पेच नदी घोगरा महादेव काळाफाटा च्या डोहात बुडून मृत्यू  

*बाबुलवाङा चा तरुणाचा पेच नदी घोगरा महादेव काळाफाटा च्या डोहात बुडून मृत्यू*

पारशिवनी(ता प्र):-  पोलिस स्टेशन हदीत मौजा पेचनदी ,घागेरा माहादेव काळाफाटा चे उतर दिशेन पाच किलोमिटर चे अंतराने रहा युवक रैनिग करायला गेले ,रँनिग करून नदीच्या पाण्यात पोहायला गेले ,पोहता पोहता सहा युवका मध्ये एक युवक अरविंद मधुकर राऊत, वय १९बर्ष , राहणार बाबुलवाडा पाण्यात बुडाला व मरण पावला असे फिर्यादी च्या रिपौट नुसार पारशिवनी पोलिसांनी गुन्हा मर्ग क्रमांक ३६/२९नुसार दाखल करून कलम १७४ने जा फौ करुन मा पो निशा आदेशा नुसार सदर  मर्ग नोदं करून स्थानिय पोलिस तपास करित आहे .
माहीती नुसार सहा युवक पोलिस भरतीची तयारी करणार युवक पोहता पोहता डोहात बुडून मृत पावला. ही घटना पेंच नदीच्या पात्रातील काळाफाटा शिवारातील डोहात बुधवारी (७ ऑक्टोबर) सकाळी ६ ३०वाजता दरम्यान घडली. मृतकाचे नाव अरविंद मधुकर राऊत (वय १९, रा. बाबुळवाडा) आहे.
, अरविंद राउत हा आपल्या इतर मित्रांसह पोलिस भरतीची तयारी करीत होता. ते नियमितपणे रस्त्यावरच सराव करीत असे. परंतु, बुधवारी आपण नदीपात्रात धाऊ, असे मत अरविंदने व्यक्त केल्यामुळे ते सर्व बाबुळवाडा व काळाफाटा शिवारातील पेंच नदीपात्रात आले. दौड मारल्यानंतर आपण नदीत आंघोळ करू म्हणून ते ६.३0 च्या दरम्यान पाण्याजवळ आले. सुरुवातीला तीन मित्र नदीत उतरले व पोहत पोहत दुसर्‍या तीरावर जाऊ लागले. ते पूर्णत: थकल्यामुळे यातील दोघांना हात धरून एकाने बाहेर काढले. याच दरम्यान नदीतीरावर उभा असलेला अरविंद नदीत उतरला. तो पोहण्यात तरबेज नव्हता. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. अशातच तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्याकरिता एक युवक पाण्यात कुदला. परंतु, तो अरविंदला वाचविण्यात असफल ठरला. लागलीच घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संदीप शेडें शिक्षक यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Thu Oct 8 , 2020
*कोलितमारा आदिवासी डोंगराळ, वनाच्छादित दुर्गम पेंच व्याघ्र प्रकल्पातील आश्रमशाळा संदीप शेडें शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर* कमलासिह यादव पाराशिवनी तालुका प्रीतानिधी पाराशिवनी (ता प्र) : स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाउंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ देशभरातील १६९ प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी […]

You May Like

Archives

Categories

Meta